Corona : पुण्यातील 5 तालुक्यातील 27 गावंही सील
कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या पुणे जिल्ह्यातील 5 तालुक्यातील एकूण 27 गावं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 3 मेपर्यंत (Pune 27 Villages Sealed ) लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. मात्र, तरीही रुग्णांचा आकडा कमी व्हायला तयार नाही. त्यातच देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. तर पुणे हे कोरोना हॉटस्पॉटपैकी एक आहे. त्यामुळे पुण्यात 20 एप्रिलपासून 7 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील 27 गावंही सील (Pune 27 Villages Sealed) करण्यात आली आहे.
कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या पुणे जिल्ह्यातील 5 तालुक्यातील एकूण 27 गावं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले. त्यामुळे जिल्ह्यातील या 5 तालुक्यातील ही 27 गावे आता पूर्णपणे सील करण्यात आली आहेत.
सील करण्यात आलेली गावे पुढीलप्रमाणे –
- बारामती नगरपरिषद – संपूर्ण बारामती नगरपरिषद हद्द
- हवेली तालुका – जांभूळवाडी, वाघोली, आव्हाळवाडी, बावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभूळवाडी, कोळेवाडी, कोल्हेवाडी, नर्हे, खानापूर, लोणीकंद, उरुळीकांचन, पिसोळी, वडाचीवाडी, हांडेवाडी
- शिरुर तालुका- विठ्ठलवाडी, शिक्रापूर
- वेल्हा तालुका – निगडे , मोसे
- भोर तालुका – नेरे
- जुन्नर तालुका – डिंगोरे
Pune 27 Villages Sealed
पुण्यातील स्थिती काय?
राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 हजारचा टप्पा ओलंडला आहे. तर एकट्या पुण्यात कोरोनाचे 663 रुग्ण आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 20 एप्रिलपासून संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे सील करण्यात आलं आहे. पुढील सात दिवस पुणे शहरात कडक कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
पुण्यात कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका क्षेत्र हे संक्रमणशील म्हणून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या काळात फक्त जीवनावश्यक सेवा म्हणजे आरोग्य विषयक, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, महापालिका आणि शासकीय सेवा सुरु राहतील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 4666 पार
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. काल (20 एप्रिल) महाराष्ट्रात नव्या 466 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्याचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत आज 308 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 4 हजार 666 वर पोहोचला आहे. देशाची राजधानी असलेल्या मुंबईत आज 308 नव्या रुग्णांची रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईतील धारावी परिसरात 30 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे धारावी परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 168 वर पोहोचली आहे. तर दादरमध्ये 2 नवे कोरोना रुग्ण आढळले आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 032 वर पोहोचला आहे.
Pune 27 Villages Sealed
संबंधित बातम्या :
मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करणार : राजेश टोपे
महाराष्ट्रातील 81 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच नाहीत : आरोग्य मंत्री
सोलापुरात कोरोनाचा विळखा वाढला, दिवसभरात 10 नवे कोरोनाबाधित रुग्ण
Corona Update | मुंबईतील कोरोनाचा आकडा 3032 वर, राज्यात 4666 रुग्ण