Pune Corona | पुण्यात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण वाढलं, आतापर्यंत 2,875 जणांची कोरोनावर मात
पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ही कमालीचं वाढलं आहे.
पुणे : पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने (Pune Corona Patients Discharged) वाढत आहे. मात्र, बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ही कमालीचं वाढलं आहे. बुधवारपर्यंत पुण्यात 5 हजार 427 बाधित रुग्ण होते. आतापर्यंत 2 हजार 875 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 596 अंकांनी (Pune Corona Patients Discharged) जास्त आहे.
15 क्षत्रिय कार्यालयांपैकी पाच विभागात रुग्ण डिस्चार्ज होण्याच प्रमाणही जास्त आहे. कंटेनमेंट क्षेत्रातच बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे. ढोले पाटील रस्ता इथं सर्वाधिक तब्बल 562 रुग्ण बरे झाले आहेत.
कुठे किती रुग्ण बरे?
- येरवडा धानोरी -344
- नगर रोड वडगाव शेरी -81
- वानवडी रामटेकडी -126
- हडपसर मुंढवा- 61
- कोंढवा येवलेवाडी- 43
- बिबवेवाडी- 148
- भवानी पेठ -495
- ढोले पाटील -562 (Pune Corona Patients Discharged)
- कसबा विश्रामबाग- 327
- शिवाजीनगर घोले रोड 340
- औंध बाणेर -6
- कोथरूड बावधन-13
- वारजे कर्वेनगर-18
- सिंहगड रोड -17
- धनकवडी सहकारनगर -137
ससून रुग्णालयात आज तिघांचा कोरोनाने मृत्यू
दुसरीकडे, पुण्यातील ससून रुग्णालयात आज तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ससून रुग्णालयात आतापर्यंत तब्बल 146 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर रुग्णालयात दिवसभरात 10 बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 153 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मृत रुग्णांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. तर डिस्चार्ज झालेल्या रुग्णांमध्ये पाच पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. दोन वर्षीय चिमुकलीनेही कोरोनावर मात केली आहे. त्याचबरोबर 22 आणि 30 वर्षीय पुरुष कोरोनातून बरे (Pune Corona Patients Discharged) झाले आहेत.
Solapur Corona | सोलापुरात कोरोनाचे 653 रुग्ण, ग्रामीण भागातही शिरकावhttps://t.co/NPt8zIAbRF#CoronaVirusUpdates #CoronaVirusUpdate #lockdownindia
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 27, 2020
संबंधित बातम्या :
मुंबई पुण्यातील चाकरमान्यांनी अहमदनगरची चिंता वाढवली, जिल्ह्यात 94 कोरोनाबाधित
पुण्यात कोरोना लक्षणांच्या दुर्लक्षाने शुक्रवारी एका तरुणाचा, तर सोमवारी एका महिलेचा मृत्यू
पुणे मनपाची कोरोना रोखण्यासाठी बैठक, बैठकीला 2 तास हजेरी लावलेल्या महिला अधिकाऱ्याच्या पतीला कोरोना