पुण्यात श्रीमंत महिला, आयटीतील तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक

गुन्हे शाखेने अनिकेत बुबने या उच्चशिक्षित भामट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या भामट्याकडून 1 कोटी 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुण्यात श्रीमंत महिला, आयटीतील तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक
Follow us
| Updated on: Jun 14, 2020 | 9:10 PM

पुणे : श्रीमंत महिला आणि आयटीतील (Pune Crime Love Trap) तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून गंडा घालणाऱ्या भामट्याला जेरबंद करण्यात आलं आहे. गुन्हे शाखेने अनिकेत बुबने या उच्चशिक्षित भामट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या भामट्याकडून 1 कोटी 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात (Pune Crime Love Trap) आला आहे.

आरोपीकडून 98 लाख 10 हजार रोकड आणि 9 लाखाची कारही जप्त करण्यात आली आहे. डेटिंग साईटच्या माध्यमातून तो श्रीमंत महिला, आयटी तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवत होता. यासाठी तो चार बनावट अकाउंटचा वापर करत होता.

आरोपीने गेल्या एक वर्षापासून फिर्यादीच्या घरातून 1 कोटी 74 लाख रुपय लुटलेत. फिर्यादी हे व्यावसायिक असून त्यांच्या भावजईला प्रेमाच्या जाळ्यात ओढल होतं. तिच्या मदतीने आरोपीने तब्बल दीड कोटी रोकड आणि दागिने चोरले होते.

बिबवेवाडी परिसरात या भामट्याचं भागीदारीत हॉटेल आहे. मात्र, पैशासाठी आयटी कंपनीत चांगल्या पगारावर काम करणाऱ्या मुलींवर त्याचा डोळा होता. आयटीतील तरुणींना तो प्रेमात अडकवत होता. प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणींना बदनामीची धमकी देऊन तो पैसे उकळत होता. हॉटेल व्यवसायाबरोबर मुलींना फसवून पैसे कमावण्याचा त्याचा हा दुसरा उद्योग होता (Pune Crime Love Trap).

अनिकेत हा उच्चशिक्षित एमसीए असल्याने कोणताही पुरावा ठेवत नव्हता. त्यामुळे आरोपीच्या मुसक्या आवळने कठीण झालं होतं. आरोपीने सर्व जुने मोबाईल बंद केल्याने पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीच्या माध्यमातून माग काढला.

आरोपी एका जुन्या मैत्रिणीच्या संपर्कात आल्यावर तीने बाणेरला भेटायला बोलावलं. यावेळी सापळा रचलेल्या पोलिसांनी त्याला अटक केली. अशाप्रकारे त्याने आणखी किती महिलांची, तरुणींची फसवणूक केली, याबाबतचा पोलीस तपास करत आहेत.

Pune Crime Love Trap

संबंधित बातम्या :

पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा भांडाफोड, 47 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त

पुण्यात रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई, शर्ट काढून थुंकी पुसायला लावली

बुलडाण्यात वयोवृद्ध दाम्पत्याचा जळून मृत्यू, घातपात की आत्महत्या?

तुझं वागणं बरोबर नाही, चारित्र्यावरुन संशय, पती, सासू, दिराकडून विवाहितेचं मुंडन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.