पुण्यात कर्फ्यूच्या व्याप्तीत वाढ, 28 नवीन भागात संचारबंदी, कुठे-कुठे कर्फ्यू लागू?

पुण्यात कर्फ्यू लावलेल्या 33 भागात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर किंवा गल्लीत फिरण्यास, उभे राहण्यास मनाई आहे. (Pune Curfew Spots Increased amid Corona epidemic)

पुण्यात कर्फ्यूच्या व्याप्तीत वाढ, 28 नवीन भागात संचारबंदी, कुठे-कुठे कर्फ्यू लागू?
Follow us
| Updated on: Apr 15, 2020 | 8:10 AM

पुणे : ‘कोरोना व्हायरस’च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कर्फ्यूची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. पाच परिमंडळ क्षेत्रातील 12 पोलिस स्टेशनच्या हद्दीतील 28 नवीन भागातही कर्फ्यू लावण्यात आला आहे. पुण्यात पूर्वीच्या पाच भागांसह आता एकूण 33 भागात कर्फ्यू असेल. बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून तीन मेपर्यंत कर्फ्यू कायम राहणार आहे. (Pune Curfew Spots Increased amid Corona epidemic)

पुणे महापालिकेने कर्फ्यूची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावानुसार सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी आदेश दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जीवितहानीची भीती, तसेच आरोग्य आणि सुरक्षेला धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्फ्यूच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर किंवा गल्लीत फिरण्यास, उभे राहण्यास मनाई आहे. नियमांचं उल्लंघन केल्यावर कलम 188 सह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

यापूर्वीच पूर्व मध्यभाग सील करण्यात आला असून चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच ठिकाणी कर्फ्यू आहे. मात्र पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयातून जीवनावश्‍यक घटक, पासधारक, माध्यमांना वगळण्यात आलं आहे.

पुण्यात कुठे कुठे कर्फ्यू?

परिमंडळ – 1

खडक पोलीस स्टेशन

1) गंजपेठ-

माशे आळी चौक, लहुजी वस्ताद चौक, पुणे मनपा कॉलनी, लोहियानगर पोलिस चौकी चौक, महात्मा फुले वाडा कमान, चांदतारा चौक

2) काशेवाडी भवानी पेठ परिसर-

पिंपळे मळा भिमाले संकुल, भगवा चौक, धम्मपाल चौक, गोल्डन जुबिली चौक, आनंद नगर मित्र मंडळ चौक, सारनाथ बुद्धविहार

परिमंडळ -2

1) बंडगाईन पोलिस स्टेशन

अ) सिटी पॉइंट- उल्हासनगर, नदी किनारी झोपडपट्टी, ताडीवाला रोड परिसर उत्तर बाजू

ब) जहांगिर चौक – लडकतवाडी, मेरो हॉटेल चौक, लोकसेवा वसाहत परिसर झोपडपट्टी, महात्मा फुले वसाहत, दुष्काळ झोपडपट्टी, मनपा चौक झोपडपट्टी परिसर, बाल मित्र मंडळ झोपडपट्टी, कपिला डेरी वसाहत झोपडपट्टी, सिद्धेश्वर मंडळ वसाहत झोपडपट्टी

क) सौरभ हॉल – जगताप चाळ, दीपगृह समोरील बाजू, राजगुरु चौक, रेल्वे कॉलनी आर बी वन, भाजी मार्केट रोड, संगीता झोपडपट्टी वसाहत, प्रगती मित्र मंडळ वसाहत, सिद्धेश्वर चौक झोपडपट्टी वसाहत, राजरत्न बुद्धविहार झोपडपट्टी परिसर

ड) मध्य रेल्वे डीआरएम ऑफिसजवळ लुम्बिनी नगर- पत्रा चाळ, इनाम मज्जित परिसर संपूर्ण, इंदिरानगर झोपडपट्टी, इनाम नगर वसाहत, सर्व रेल्वे कॉलनी, पानवळ परिसर, सरस्वती सोसायटी, विनायक नगरीसमोरील झोपडपट्टी परिसर, पाच बिल्डिंग परिसर, स्वीपर चाळ, शुरवीर चौक परिसर वसाहत,

ई) नायडू हॉस्पिटल जवळील वसाहत – काची वस्ती झोपडपट्टी

हेही वाचा  : पुण्यात ‘कोरोना’चा विळखा घट्ट, आणखी 22 ठिकाणे होणार सील, वाचा संपूर्ण यादी

परिमंडळ – 3

1) सिंहगड रोड पोलिस स्टेशन-

राजीव गांधी नगर

2) दत्तवाडी पोलिस स्टेशन

पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन परिसर

3) वारजे पोलिस स्टेशन

रामनगर, गोकुळ नगर, तिरुपती नगर

4) कोथरुड पोलिस स्टेशन

काळेवाडी, सुतारदरा, जय भवानी नगर

परिमंडळ – 4

1) विश्रांतवाडी पोलीस स्टेशन

अ) कळसगाव- कळसगाव मुख्य रस्ता, आर एन डी रस्ता, दर्गा शेजारील रस्ता

ब) मस्के वस्ती शारदा हॉटेल, ट्रीडम पार्क

क) चव्हाण चाळ मच्छी मार्केट रोड, शांती नगरकडून जाणारा रोड, फुल बाजार रोड

ड) भीमनगर गांधी टपरी, बीआरटी बस स्टॉप शेजारील रस्ता

ई) वडार वस्ती ममता गिफ्ट शॉपी रोड, धानोरी रोडला बाहेर पडणारा रस्ता

फ) श्रमिक नगर विद्यानगर शेवटचा बस स्टॉप, भैरव नगरकडून जाणारा रोड

2) खडकी पोलिस स्टेशन

सम्राट हॉटेल, भोसलेवाडी, कामगार आयुक्त कार्यालय, ईराणी वस्ती, नाबार्ड बँक, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चौक

चंदन नगर पोलिस स्टेशन प्रभाग क्रमांक पाच, आनंद पार्क, स्टेला मेरी स्कूल, सिद्धिविनायक मंदिर, टेम्पो चौक

3) विमानतळ पोलिस स्टेशन

गांधीनगर, जय प्रकाश नगर

4) येरवडा पोलिस स्टेशन

लक्ष्मीनगर परिसर, रामनगर, जय जवान नगर, डेक्कन कॉलेज कॉम्प्लेक्स, म्हाडा वसहत, बिडी कामगार वसाहत, नवी खडकी, काश्मिरी कॉलनी, मदर टेरेसा चौक, गाडीतळ, येरवडा गावठाण

परिमंडळ – 5

हडपसर पोलिस स्टेशन

वैदुवाडी, म्हाडा कॉलनी परिसर रेल्वे लाईन जवळील वसाहती

हेही वाचा : भवानी पेठेत 78 रुग्ण, केवळ एक कोरोनामुक्त, पुण्यातील ‘कोरोना’ प्रादुर्भावाचा प्रभागनिहाय आढावा

(Pune Curfew Spots Increased amid Corona epidemic)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.