Pune ICU Ventilator Bed | पुण्यात आयसीयू व्हेंटिलेटरचा एकही बेड शिल्लक नाही!

पुणे शहरात रविवारी एकाच दिवसात विक्रमी कोरोनाबळींची नोंद झाली. काल दिवसभरात 41 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले.

Pune ICU Ventilator Bed | पुण्यात आयसीयू व्हेंटिलेटरचा एकही बेड शिल्लक नाही!
फोटो प्रातिनिधीक
Follow us
| Updated on: Jul 20, 2020 | 11:32 AM

पुणे : पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेला लॉकडाऊन सुरु असतानाच आरोग्य व्यवस्थेविषयी चिंता निर्माण करणारी माहिती समोर आली आहे. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये आयसीयू व्हेंटिलेटरचा एकही बेड शिल्लक नसल्याची माहिती समोर येत आहे. (Pune Hospitals have no ICU Ventilator Bed)

divcommpunecovid.com या विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार पुण्यात सध्या एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अत्यवस्थ रुग्णांच्या व्यवस्थेबाबत काळजी व्यक्त केली जात आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

पुण्यात कोरोनाचा विळखा गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना मृत्यूचा धोका टाळण्यासाठी तातडीच्या उपचारांची गरज असते. मात्र आयसीयू व्हेंटिलेटर बेडअभावी रुग्णांची गैरसोय होण्याची भीती आहे. (सोमवार 20 जुलै सकाळी 10 वाजेपर्यंतची आकडेवारी)

विक्रमी कोरोनाबळींची नोंद

पुणे शहरात रविवारी एकाच दिवसात विक्रमी कोरोनाबळींची नोंद झाली. काल दिवसभरात 41 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. कोरोनाबळींचा एकूण आकडा 976 वर पोहोचला आहे. व्हेंटिलेटरअभावी रुग्णांच्या बळींमध्ये वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : पुणे जिल्हा परिषदेला कोरोनाचा विळखा, 600 पैकी 510 कर्मचारी होम क्वारंटाईन

पुणे जिल्ह्यात गेल्या बारा तासात 473 कोरोना रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 51 हजार 885 वर गेली आहे. तर आत्तापर्यंत 1 हजार 343 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Pune Hospitals have no ICU Ventilator Bed)

हायरिस्क गटातील रुग्णांना गरज

अस्थमा, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार किंवा एखादे आजार असलेले, 60 वर्षावरील वयोगटातील रुग्ण हाय रिस्क गटात मोडतात. अशा रुग्णांना व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची गरज भासते. मात्र पुण्यात आयसीयू व्हेंटिलेटरचा एकही बेड शिल्लक नसल्याने चिंता वाढली आहे.

(Pune Hospitals have no ICU Ventilator Bed)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.