Pune Dam | पुण्यातील चारही धरणात 79 टक्के पाणीसाठा, खडकवासाला धरण भरले
पुण्यातील खडकवासला धरणातून 16 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला (Pune Khadakwasla Dam full) आहे. यामुळे भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून 16 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. (Pune Khadakwasla Dam full)
तसेच नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तर नदीपात्राच्या किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमधील खडकवासला धरणात 1.97 टीएमसी म्हणजे शंभर टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तर पानशेत धरणात 9.41 टीएमसी म्हणजेच 88.41 टक्के जलसाठा, वरसगाव 9. 60 टीएमसी म्हणजेच 74.46 टक्के पाणीसाठा, टेमघर 2. 21 टीएमसी म्हणजेच 59.60 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
पुण्यातील चारही धरणात तब्बल 23. 19 टीएमसी म्हणजेच 79. 57 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र गेल्या वर्षीच्या 29. 15 टीएमसी म्हणजेच 100 टक्के त्या तुलनेत अजूनही पाणीसाठा कमी आहे.
राज्यातील धरणं 44.8 टक्के भरली
राज्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील सर्व धरणं मिळून एकूण 44.8 टक्के भरली आहेत. यंदा जून महिन्यात चांगला पाऊस पडला आहे. जुलै महिन्यातही बऱ्याच भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडतोय. त्यामुळेच राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. त्यासोबतच धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे.
जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतच्या राज्यातील मोठी, मध्यम आणि लघु अशी सर्व धरणं मिळून 44.8 टक्के भरली आहेत. कोकण विभागातील धरणांमध्ये सध्या सर्वाधिक म्हणजे 58.9 टक्के पाणीसाठा आहे, तर त्यापाठोपाठ नागपूर विभागातील धरणं 52.82 टक्के भरली आहेत. (Pune Khadakwasla Dam full)
राज्यात कुठल्या विभागातील धरणं किती भरली?
विभाग धरणातील पाणीसाठा
- अमरावती – 36.96 टक्के
- कोकण – 58.9 टक्के
- नागपूर – 52.82 टक्के
- नाशिक – 37.87 टक्के
- पुणे – 37.87 टक्के
- औरंगाबाद – 42.21 टक्के
संबंधित बातम्या :
पुणेकरांसाठी खुशखबर, धरणांमध्ये मुबलक पाणी, खडकवासला धरण 92.61 टक्के भरलं
Pune Rain | पुणेकरांची तहान वर्षभर भागणार, पुण्यातील धरणांमध्ये 62.21 टक्के पाणीसाठा