पुणे महापालिकेच्या शाळा सुरु होण्यापूर्वीच कोरोनाग्रस्त शिक्षक आढळला!, 230 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यास सुरुवात
राज्य सरकारनं 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचे संकेत यापू्र्वीच दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शाळांनी तयारी सुरु केली आहे. पुणे महापालिकेकडूनही शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहे. मात्र, भवानीपेठेतील उर्दू शाळेतील एका शिक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे शाळा सुरु होण्याबाबत प्रश्न विचारले जात आहेत
पुणे: दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार माध्यमिक विभागाच्या 43 शाळा सुरु करण्याची तयारी पुणे महापालिका करत आहे. मात्र शाळा सुरु होण्यापूर्वीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या भवानीपेठमधील उर्दू शाळेतील एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. (Pune Municipal School teacher corona positive)
राज्य सरकारनं 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचे संकेत यापू्र्वीच दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शाळांनी तयारी सुरु केली आहे. पुणे महापालिकेकडूनही शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहे. मात्र, भवानीपेठेतील उर्दू शाळेतील एका शिक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे शाळा सुरु होण्याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. पुणे महापालिकेच्या शाळेत माध्यमिक विभागाचे एकूण 230 शिक्षक आहेत. या सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यात अजून काही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर शाळा बंदच ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी
दुसरीकडे पुणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांत्या तुलनेत गुरुवारी 859 कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी एकूण ३६८ कोरोनारुग्ण सापडले होते. सध्या पुणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 3 हजार 793 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर 5 हजार 872 जण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा वाढताना दिसत आहे.
हरियाणात 8 शाळांमधील 80 विद्यार्थ्यांना कोरोना
दिल्ली, हरियाणामध्ये कोरोनाचा कहर सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. हरियाणातील रेवाडीमध्ये 5 सरकारी शाळा आणि 3 खासगी शाळांमधील 80 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि राज्याच्या आरोग्य विभागात एकच खळबळ माजली आहे. या शाळांना पुढील 15 दिवस बंद ठेवण्याचे आणि शाळा सॅनिटाईज करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
हरियाणा सरकारने दिलेल्या आदेशानुसार 2 नोव्हेंबरपासून 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या. आरोग्य विभागानं दिवाळीपूर्वी काही सरकारी आणि खासगी शाळांमधील 837 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यात 80 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं.
संबंधित बातम्या:
हरियाणात कोरोनाचा कहर!, 8 शाळांमधील 80 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, आरोग्य विभागात खळबळ
योगी सरकारचा मोठा निर्णय, 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरु, गाईडलाईन्स जारी
चंद्रपुरात रस्त्यावरील मुलांसाठी अनोखी शाळा, रोज एक तास महिला सदस्यांकडून शिकवणीचे वर्ग
Pune Municipal School teacher corona positive