गाडीवरुन नाही, पायी जा, दारु खरेदीसाठी पुणे पोलिसांचे 6 नियम
पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. वेंकटेशम यांनी दारु खरेदी- विक्रीसाठी काही विशिष्ट नियमावली (Liquor buying selling rules by Pune Police) जाहीर केली.
पुणे : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मुदत वाढीच्या निर्णयासोबत सरकारने अनेक निर्बंध (Liquor buying selling rules by Pune Police) शिथिल केले आहेत. त्यानुसार आता राज्यात दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, पुणे शहरासह ग्रामीण भागातही मद्यनिर्मितीसह विक्रीला मंजूरी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. वेंकटेशम यांनी दारु खरेदी- विक्रीसाठी काही विशिष्ट नियमावली जाहीर केली.
पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी ट्विटद्वारे हे नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार पुण्यातील मद्य प्रेमींनी दारु खरेदीसाठी पायी जावं लागणार आहे. जर एखाद्या व्यक्ती गाडी घेऊन गेल्यास पोलीस ती गाडी जप्त करत दंड ठोठावणार आहे.
त्याशिवाय सिक्यूरिटी बाँड म्हणून अडीच हजार रुपये घेतले जाणार आहे. तसेच जर कोणत्याही दुकानाबाहेर गर्दी झाली तर दुकानदारावर कारवाई होणार आहे. त्यामुळे दुकानाबाहेर गर्दी होऊ नये ही जबाबदारी संबंधित दुकानदाराची आहे.
कंपन्या (ज्यांचे कारखाने containment हद्दीबाहेर आहेत) व कन्स्ट्रक्शन (प्रत्यक्ष जागेवर) यांना वैयक्तिक वाहनापेक्षा ‘समर्पित बस गाड्यां’च्या वाहतुकीला परवानगी आहे. https://t.co/BhUKTtznrG येथे सुविधा उपलब्ध. ३/३
— CP Pune City (@CPPuneCity) May 4, 2020
मद्यविक्रीदरम्यान सामाजिक अंतर पाळले जातील याची खबरदारी संबंधित दुकानांनी घेतली पाहिजे. सामाजिक अंतर राखण्यासाठी लोकांना दुकानाबाहेर थांबवावे. सॅनिटायझर्सची व्यवस्था करावी. जी दुकाने रेड झोनमध्ये आहेत, त्यांचे हे कर्तव्यच आहे, असे ट्विट पोलीस आयुक्तांनी केलं आहे.
सामाजिक अंतर राखण्यासाठी लोकांना दुकानाबाहेर थांबवावे. सॅनिटायझर्सची व्यवस्था करावी. तसेच, पूर्वीप्रमाणेच वैध परवाना असल्याखेरीज वाहनाला परवानगी नाही यात मध्य खरेदीच्या कारणांचाही समावेश आहे. घराजवळच्या दुकानातून खरेदी करावी. अन्यथा जप्ती व किमान २५००₹ च्या हमीपत्राची कारवाई२/३
— CP Pune City (@CPPuneCity) May 4, 2020
प्रत्येक दुकानदाराने टोकन आणि वेळ देण्याची पद्धत अवलंबावी. पूर्वीप्रमाणेच वैध परवाना असल्याखेरीज वाहनाला परवानगी नाही. यात मद्य खरेदीच्या कारणांचाही समावेश आहे. घराजवळच्या दुकानातून खरेदी करावी. अन्यथा जप्त आणि किमान 2 हजार 500 रुपयांच्या हमीपत्राची कारवाई केली जाईल. सोमवारी झालेल्या दिवसभराच्या गोंधळानंतर पोलीस आयुक्तांनी ट्वीटरद्वारे हे नियम पाळण्याचे आदेश (Liquor buying selling rules by Pune Police) दिले आहेत.
संबंधित बातम्या :
पुणे जिल्ह्यात मद्य विक्री आणि उत्पादनाला परवानगी, कंटेनमेंट झोनमधील निर्बंध कायम