AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, घराजवळ मध्यरात्री थरारक हल्ला

कोयता आणि चाकूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात कसबा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी दीपक मारटकर गंभीर जखमी झाले होते.

पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, घराजवळ मध्यरात्री थरारक हल्ला
| Updated on: Oct 02, 2020 | 11:59 AM
Share

पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी दीपक मारटकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. दीपक मारटकर यांच्यावर पाच ते सहा जणांनी मध्यरात्री हल्ला केला होता. दीपक मारटकर हे शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते. (Pune Yuvasena Official Deepak Maratkar Killed)

कोयता आणि चाकूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दीपक मारटकर गंभीर जखमी झाले होते. गुरुवारी रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुण्यातील बुधवार पेठेतील गवळी आळीसारख्या शहरातील मध्यवर्ती भागात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दीपक हे शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते. विजय मारटकर हे शिवसेनेच्या तिकीटावर दोन वेळा बुधवार पेठ भागातून नगरसेवकपदी निवडून आले होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच विजय मारटकरांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे मारटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकं काय झालं?

दीपक मारटकर काल रात्री जेवणानंतर बाहेर आले. आधीच दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. मारटकरांचे डोळे, डोके, पाठ आणि छातीवर सपासप वार करुन हल्लेखोर बाईकवरुन पसार झाले.

दीपक मारटकर यांना उपचारासाठी पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सर्व हल्लेखोरांनी मास्क लावला होता, तसेच बाईकला नंबर प्लेट नव्हती. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फूटेज शोधून असून अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

रायगडमध्ये राजकीय पूर्ववैमनस्यातून शिवसैनिकाची हत्या

अहमदनगरमध्ये शिवसेना उपतालुका प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

(Pune Yuvasena Official Deepak Maratkar Killed)

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.