शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, वादळग्रस्त कोकणाला उभं करण्यासाठी प्लॅन ठरला

आपल्या दोन दिवसीय कोकण दौऱ्यानंतर माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे (Sharad Pawar meet Uddhav Thackeray on Kokan action plan).

शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, वादळग्रस्त कोकणाला उभं करण्यासाठी प्लॅन ठरला
Follow us
| Updated on: Jun 11, 2020 | 7:07 PM

मुंबई : आपल्या दोन दिवसीय कोकण दौऱ्यानंतर माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे (Sharad Pawar meet Uddhav Thackeray on Kokan action plan). या भेटीत पवारांनी कोकणातील चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा लेखाजोखा मांडत कोकणाला पुन्हा उभं करण्यासाठीचा अॅक्शन प्लॅनच मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आहे. या बैठकीत नुकसान भरपाईत वाढ करण्याच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. तसेच विद्युत आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजन करण्याचं निश्चित करण्यात आलं.

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणातील या भागात फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी या भेटीत सांगितलं. यासाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याची तयारीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवली आहे. फळबागा पुन्हा उभ्या करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची जुनी रोजगार हमी योजना लागू करण्याची गरज असल्याचा मुद्दाही शरद पवार यांनी बैठकीत मांडला. कचऱ्याचे ढिगारे साफ करुन घरे, बागा आणि दुकाने स्वच्छ करावी लागतील. हे मोठं काम असल्याने यासाठी रोजगार हमी योजनेचा वापर करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

शरद पवार यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत प्रमुख मागण्या

  • अन्नधान्य पुरवठा विभागाकडून पीडितांना सध्या 5 किलो तांदूळ, गहू आणि 1 लिटर केरोसिन विनामूल्य मदत देण्यात येते. या भागातील विद्युत व्यवस्था पूर्ववत होण्यास महिन्याचा अवधी लागेल. त्यामुळे प्रत्येक पीडित कुटुंबाला किमान 5 लिटर केरोसिन दरमहा देण्याची गरज.
  • पर्यटन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, हर्णे, दापोली, अलिबाग, मुरुड-जंजिरा वगैरे भागात कोरोनापाठोपाठ चक्रीवादळामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज.
  • बँका बंद असल्याने नागरिकांच्या हाती पैसे नाहीत. शेती व इतर व्यवसायांचे जुन्या कर्जांचे हफ्ते भरण्यासाठी आणि नवीन कर्ज देण्यासाठी बँका सुरु होणे गरजेचे.
  • नवीन कर्ज घेताना संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन काही सवलती देता येतील का हे पाहणे गरजेचे.

संबंधित बातम्या :

कोकणाला 9 दिवसात काहीच मदत मिळाली नाही, लोकांना जिथं ठेवलंय ती अवस्था खुराड्यासारखी : फडणवीस

शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? सुनील तटकरे म्हणतात…

Sharad Pawar meet Uddhav Thackeray on Kokan action plan

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.