Pune Corona | पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या पार
पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज (10 जून) जिल्ह्यात दिवसभरात 435 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला (Total COVID-19 Patients In Pune) आहे. आज (10 जून) जिल्ह्यात दिवसभरात 435 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 10 हजार 394 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 449 जण कोरोनाचे बळी (Total COVID-19 Patients In Pune) ठरले आहेत.
पुणे मनपाच्या हद्दीत दिवसभरात 304 नवीन बाधित रुग्णांचा वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 8 हजार 509 वर पोहोचला आहे. तर तिघांचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे. पुण्यात आतापर्यंत 406 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 271 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 5 हजार 575 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
पुण्यात सध्या कोरोनाचे 2 हजार 528 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 214 रुग्ण क्रिटीकल आहेत. तर 43 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.
Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात तब्बल 3,254 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, आकडा 94 हजारांच्या पारhttps://t.co/oFAKiSc4yJ@rajeshtope11 #CoronaInMaharashtra #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 10, 2020
Total COVID-19 Patients In Pune
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 94 हजारांच्या पार
राज्यात आज (10 जून) तब्बल 3 हजार 254 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्ण वाढीचा हा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 94 हजार 41 वर पोहोचली आहे. यापैकी 44 हजार 517 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 46 हजार 74 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील कोरोनाबळींची संख्या 3,438 वर
राज्यात आज दिवसभरात 149 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 3 हजार 438 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 1 हजार 879 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
Total COVID-19 Patients In Pune
संबंधित बातम्या :
पुण्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा भांडाफोड, 47 कोटी 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त
पुण्यात खासगी हेलिकॉप्टर सेवा सुरु, एकावेळी 6 प्रवासी, ताशी 85 हजार दर
पुण्यात रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई, शर्ट काढून थुंकी पुसायला लावली
मुंबईतील रुग्णालयातून मृतदेह गायब, आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…