Lockdown wedding : 4 पाहुणे मुलाकडचे, 4 पाहुणे मुलीकडचे, पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत विवाह सोहळा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले (Pune Wedding during lockdown) आहे.

Lockdown wedding : 4 पाहुणे मुलाकडचे, 4 पाहुणे मुलीकडचे, पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत विवाह सोहळा
Follow us
| Updated on: May 12, 2020 | 7:49 PM

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले (Pune Wedding during lockdown) आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने लॉकडाऊन पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांची लग्न खोळंबली आहेत. आता पुन्हा लॉकडाऊन वाढणार या भीतीनं अनेकजण साध्या पद्धतीने लग्न उरकत आहेत. पुण्यातील तरुणानेही आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आपले लग्न उरकले. विशेष म्हणजे या लग्न समारंभावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटीलही उपस्थित (Pune Wedding during lockdown) होते.

पुण्यातील गुलटेकडी येथील प्रशांत सलगर आणि मार्केट यार्डमधील रेखा सोनटक्के या जोडप्याने आज (12 मे) साध्या पद्धतीने सप्तपदी घेतल्या आहेत. यांच्या लग्नासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह वधू-वराच्या कुटुंबातील जवळचे लोक उपस्थित होते.

गुलटेकडी डायस प्लॉट भागात राहणारा प्रशांत सलगर आणि मार्केटयार्ड प्रेमनगर वसाहत येथील रेखा सोनटक्के यांचा साखरपुडा जानेवारी महिन्यात झाला होता आणि यांचा विवाह एप्रिलमध्ये करण्याचे ठरले होते. मात्र, लॉकडाउन वाढल्याने हा सोहळा दोनदा पुढे ढकलण्यात आला.

विवाह होणार की नाही अशा चिंतेत असलेल्या कुटुंबाचा प्रश्न भाजप झोपडपट्टी आघाडीचे गणेश शेरला आणि गुलटेकडी एकता प्रतिष्ठानच्या पुढाकाराने सोडवण्यात आला.

ना वरात, ना कसला गाजावाजा फक्त वराकडील मोठा भाऊ आणि वधूकडील आई आणि आमदार पाटील, पुणे महापालिकेचे सभागृह नेते नगरसेवक श्रीनाथ भिमाले, भाजप झोपडपट्टी आघाडीचे शेरला, बुद्ध विहाराचे अध्यक्ष गणेश चव्हाण, सचिन खंडाळे, अमोल खंडाळे, भन्ते सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत सातारा रस्ता येथील तक्षशिला बौद्ध विहारात हा विवाह सोहळा संपन्न झाला.

संबंधित बातम्या :

Corona | नवरा-नवरी लॉकडाऊन, कोरोनामुळे ऑनलाईन विवाह

‘समीप आलेली लग्नघटिका’ पुढे ढकलली, 5 हजार वऱ्हाडी थोपवले, ‘कोरोना’मुळे विवाह सोहळे रद्द

CORONA : वधू-वरात तीन फूट अंतर, एकही नातेवाईक नको, पुण्यात सामूहिक विवाहासाठी ‘कोरोना’ अटी

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.