2024 Rashi Bhavishya in Marathi : कन्या राशीच्या लोकांसाठी असे जाणार 2024 वर्ष, या ग्रहाची लाभणार कृपा
2024 Rashi Bhavishya in Marathi कन्या राशीचे वर्ष 2024 जाणून घेण्यापूर्वी या राशीबद्दल जाणून घ्या. ज्योतिषशास्त्रात कन्या राशीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. याच्या आधी सिंह राशी येते आणि यानंतर तुला राशि येते. नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप काही घेऊन येत आहे. 2024 हे वर्ष काही प्रमाणात नफा तर काही बाबतीत तोटाही घेऊन येत आहे
मुंबई : 2024 हे नवीन वर्ष (2024 Varshik Rashifal kanya rashi) सुरू होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. हे वर्ष आपल्या राशीसाठी कसे जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. ज्योत्ष शास्त्रात वार्षिक राशी भविष्याला विशेष महत्त्व असते. वर्षाचा पुर्वार्ध, मध्य आणि उत्तरार्ध अशा तीन टप्प्यात हे भविष्य वर्तविले जाते. आतापर्यंत आपण मेष, वृषभ, मिथून, कर्क आणि सिंह राशीसाठी हे वर्ष कसे जाणार हे जाणून घेतले. आता आपण कन्या राशीसाठी 2024 हे वर्ष कसे जाणार ते जाणून घेऊया.
कन्या वार्षिक राशिभविष्य
कन्या राशीचे वर्ष 2024 जाणून घेण्यापूर्वी या राशीबद्दल जाणून घ्या. ज्योतिषशास्त्रात कन्या राशीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. याच्या आधी सिंह राशी येते आणि यानंतर तुला राशि येते. नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप काही घेऊन येत आहे. 2024 हे वर्ष काही प्रमाणात नफा तर काही बाबतीत तोटाही घेऊन येत आहे. तोटा कमी करायचा असेल तर आतापासूनच प्रयत्न सुरू करू शकता. 2024 मध्ये राहू आणि केतू या अशुभ ग्रहांचे संक्रमण पहिल्या आणि सप्तम भावात होईल. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही चुकीच्या आणि गोंधळापासून दूर राहावे लागेल. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. व्यवसायात चढ-उतार होतील. पण ही परिस्थिती वर्षभर राहील, असे नाही. सप्टेंबर 2024, ऑक्टोबर 2024 मध्ये तुमची स्थिती सुधारेल. हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असेल असे मानले जाऊ शकते.
अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हे वर्ष आव्हानांनी भरलेले असणार आहे. कष्टाला घाबरू नका. कन्या राशीच्या लोकांना 1 मे 2024 पासून आराम मिळू लागेल. 2024 मध्ये पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये धोका पत्करणे टाळणे चांगले. गुरु ग्रहाच्या कृपेने नवीन वर्षात परदेशातून लाभाची स्थिती आहे, जे लोक परदेशी कंपन्यांशी संबंधित आहेत त्यांना विशेष लाभ मिळू शकतो. परदेश प्रवासातील अडथळे दूर होतील.
2024 मध्ये विवाहासंबंधीच्या समस्याही दूर होताना दिसत आहेत. जे विवाहासाठी पात्र आहेत आणि अद्याप विवाहित नाहीत त्यांच्यासाठी चांगली बातमी येऊ शकते.
उपाय
गणपतीला आराधना करा. बुधवारी दुर्वा अर्पण करा. रुग्णांची सेवा करा. औषधे दान करा. पोपटाला खायला द्या. हिरवे कपडे आणि हिरव्या भाज्या दान करा. गाईला भाकरी खाऊ घाला.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)