ज्याने केली होती कोरोनाची भविष्यवाणी; आता त्या लिविंग नॉस्ट्राडेमस थरकाप उडवणारं आणखी एक भाकीत, चिंता वाढली
लिविंग नॉस्ट्राडेमस पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे, कारण त्याने आता यावेळी एक महाभयंकर भाकीत वर्तवलं आहे. ज्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

नॉस्ट्राडेमस हा एक प्रसिद्ध भविष्यवेत्ता होता. जेव्हा -जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा होते, त्यामध्ये नॉस्ट्राडेमस आणि बाबा वेंगा यांचं नाव सर्वात आघाडीवर असतं. बाबा वेंगा यांनी वर्तवलेली अनेक भाकीतं खरी ठरल्याचा दावा केला जातो. त्याच प्रमाणे नॉस्ट्राडेमस सदंर्भात देखील असाच दावा केला जातो. नॉस्ट्राडेमस याने आपल्या हयातीमध्ये अनेक घटनांसंदर्भात भाकीतं केली होती, ती खरी ठरले असं मानलं जातं. दरम्यान आता सध्या अशाच एका तरुणाची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्याचं लिविंग नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखलं जातं, याच तरुणानं कोरोनाबाबत भाकीत केलं होतं. जगात एक महाभंयकर साथ पसरेल, ज्यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होईल असं या व्यक्तीनं सांगितलं होतं, त्यानंतर जगभरात कोरोनाची साथ आली असा दावा या तरुणाबद्दल करण्यात येतो. या तरुणाचं नाव एथोस सालोमे आहे. मात्र त्याला सर्वत्र लिविंग नॉस्ट्राडेमस म्हणूनच ओळखलं जातं. तो पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे, यावेळी त्याने जगाचा थरकाप उडेल असं भाकीत केलं आहे.
नेमकं काय म्हणाला लिविंग नॉस्ट्राडेमस
लिविंग नॉस्ट्राडेमस पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे, कारण त्याने आता यावेळी एका महाभयंकर युद्धाबाबत भाकीत वर्तवलं आहे. त्याचं हे भाकीत खरं ठरल्यास जगभरात मोठा विध्वंस होऊ शकतो. यापूर्वी देखील त्याने कोरोनाबाबत भाकीत वर्तवलं होतं, ते खरं ठरलं असं मानलं जातं. तेव्हापासूनच लिविंग नॉस्ट्राडेमस हा चर्चेमध्ये आला. तुम्ही जर जगाचा घटनाक्रम पाहिला तर तुम्हाला माहिती पडेल की जगात एक मोठा संघर्ष होणार आहे असं त्याने म्हटलं आहे. एका रिपोर्टनुसार जगात एक मोठं युद्ध होईल, ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात विध्वंस होईल, मोठी जीवितहानी होईल, प्रचंड नुकसान होईल असं भाकीत लिविंग नॉस्ट्राडेमस याने वर्तवलं आहे. दरम्यान त्याच्या या भविष्यवाणीला आता तिसऱ्या महायुद्धाशी देखील जोडलं जात आहे.
लिविंग नॉस्ट्राडेमस याचे यापूर्वीचे देखील अनेक भाकीत खरे ठरले आहेत. ज्यामध्ये त्याने ब्रिटनची रानी एलिझाबेथ यांच्या निधनाचं भाकीत वर्तवलं होतं. रशिया आणि युक्रेन युद्धाबाबत देखील भविष्यवाणी केली होती. त्यानंतर कोरोनाबद्दल देखील सांगितलं होतं. त्याच्या या भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचा दावा केला जात आहे.