राजासारखं आयुष्य देणारा रुचक योग मकर राशीत! फेब्रुवारीत तीन राशींना मिळणार पाठबळ
जानेवारी महिना सुरु होऊन काही दिवसांचा कालावधी लोटला आहे. ग्रहांचे गोचरही ठरलेल्या कालावधीप्रमाणे होत आहे. त्यामुळे राशीचक्रावर अपेक्षित परिणाम होत आहे. त्यात मंगळ ग्रह फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात गोचर करणार आहे. त्यामुळे राशीचक्रावर सकारात्मक परिणाम होणार आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या स्वभावानुसार बदल करत असतो. नवग्रह, राशी आणि गोचर कालावधी याचं गणित त्यांची स्थिती पाहून शुभ अशुभ योगाबाबत आकलन केलं जातं. मंगळ या ग्रहाकडे मेष आणि वृश्चिक राशीचं स्वामित्त्व आहे. पण मंगळाची मकर ही उच्च रास गणली गेली आहे. शनिच्या राशीत मंगळाचा थाटपाट काही वेगळाच असतो. असा मंगळ ग्रह 5 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9 वाजून 43 मिनिटांनी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत 15 मार्चपर्यंत असेल आणि त्यानंतर कुंभ राशीत विराजमान होईल. 39 दिवस राशीचक्रावर मंगळाचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. मंगळ ग्रहाने मकर राशीत प्रवेश करताच रुचक राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग ज्या व्यक्तीच्या कुंडलीत असतो ती व्यक्ती राजासारखं जीवन जगते. भौतिक सुखांची अनुभूती या कालावधीत होते. या गोचराचा राशीचक्रातील तीन राशींवर सकारात्मक परिणाम होईल. कोणत्या राशींवर प्रभाव पडेल ते जाणून घेऊयात.
या तीन राशींवर असेल कृपा
मेष : या राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यात कर्म स्थानात मंगळ गोचर करणार असल्याने चलती असणार आहे. खासकरून जे लोक नोकरीच्या शोधात असणार आहेत त्यांनी या कालावधीत लाभ होईल. मनासारखी नोकरी या कालावधीत मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. तसेच व्यवसायिकांना धनलाभ होऊ शकतो. उद्योगधंद्याचा विस्तारही करू शकता.
धनु : मंगळाने मकर राशीत प्रवेश करताच धन स्थानात विराजमान होणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. तसेच आपल्या बोलण्याच्या प्रभाव इतरांवर पडेल. आपण जे काही बोलतो त्याचा आदर इतरांकडून होईल. त्यानुसार कामाची पद्धत अवलंबली जाईल. त्यामुळे कामंही झटपट पूर्ण होतील. मुलांच्या बाबतही गूड न्यूज मिळू शकते.
तूळ : या राशीच्या चतुर्थ स्थानात मंगळ ग्रह गोचर करणार आहे. हे स्थान प्रॉपर्टी आणि वाहनाशी निगडीत आहे. त्यामुळे भौतिक सुखांची अनुभूती या कालावधीत होईल. व्यवसायिक जीवनातही सुधारणा दिसून येईल. करिअरमध्ये आतापर्यंत आलेले अडथळे दूर होण्यास मदत होईल. आर्थिक सुधारण्यास अर्धांगिनीची मदत होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)