मेष राशीसाठी शनि साडेसातीचा कठीण काळ सुरु, कसा आहे राशीचक्रावर प्रभाव जाणून घ्या
राशीचक्रातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे अडीच वर्षानंतर शनि महाराजांनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिष विश्वातील ही सर्वात मोठी घडमोड आहे. कारण अडीच वर्षानंतर राशीचक्रात मोठी उलथापालथ झाली आहे. त्याचा परिणाम राशीचक्रावर होणार आहे. कोणत्या राशीवर काय प्रभाव पडेल ते जाणून घ्या.

शनिदेवांचा नाव ऐकलं की अनेकांना घाम फुटतो. कारण वाईट कर्माची फळं या कालावधीत भोगावी लागतात. तर काही जणांना गतजन्माच्या पापकर्मांसाठी त्रास होतो. त्यामुळे शनिदेव आली की वाईट कर्मांचा हिशेब एकदम योग्य पद्धतीने होतो. पण हा त्रास सहन करण्याची क्षमता नसल्याने धाकधूक वाढते. त्यामुळे शनिदेवांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. शनि महाराजांना 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. शनिवारी रात्री 10 वाजून 7 मिनिटांनी मीन राशीत गोचर केलं. आता शनिदेव अडीच वर्षे या राशीत ठाण मांडून बसणार आहे. शनिदेव 3 जून 2027 पर्यंत सकाळी 6 वाजून 23 मिनिटांपर्यंत या राशीत असतील. त्यानंतर मेष राशीत येतील. मेष राशीला साडेसाती सुरु झाली असून मकर राशीची साडेसाती संपली आहे. शनिदेव हे मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहेत. तर तूळ ही त्यांची उच्च रास आणि मेष ही त्यांची नीच रास आहे.
शनिदेवांच्या गोचरामुळे कुंभ राशीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. तर मीन राशीतच शनिदेव असून साडेसाती मधला टप्पा सुरु आहे. मेष राशीला सुरुवातीची अडीच वर्षांची साडेसाती सुरु झाली आहे. तर सिंह राशीच्या आठव्या, तर धनु राशीच्या चौथ्या स्थानी असल्याने अडीचकी म्हणजेच पनौती सुरु झाली आहे. तर वृश्चिक आणि कर्क राशीची अडीचकी संपली आहे.
या राशींवर होणार परिणाम
मेष : शनीची ‘साडेसती’ सुरू झाली आहे. तुमच्या राशीत शनिदेव बाराव्या स्थानात आहेत. शनीच्या साडेसतीचा पहिला टप्पा सुरू झाल्याने तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
वृषभ : शनिदेवांनी एकादश स्थानात प्रवेश केला आहे. नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. कुंडलीत शनि शुभ स्थितीत असल्यास गोचर संक्रमण चांगले ठरेल.
मिथुन : शनि दहाव्या घरात भ्रमण करत आहे. कुंडलीतील दहावे स्थान करिअर, नोकरी आणि समाजातील मानसन्मानाचे आहे. अशा परिस्थितीत, शनीचे भ्रमण तुमच्यासाठी चांगले ठरेल.
कर्क : कर्क राशीच्या नवव्या म्हणजेच भाग्य स्थानात शनिदेव येत आहेत. आर्थिक दृष्टिकोनातूनही हे गोचर तुमच्यासाठी खूप चांगले राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो.
सिंह : सिंह राशीत शनीचा अडीचकी सुरू झाली आहे. शनि तुमच्या आठव्या घरात आहे. त्यात स्वामी ग्रह सूर्याशी पटत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.
तूळ : सहाव्या स्थानात शनिदेव असल्याने तुम्ही तुमच्या शत्रूंवर आणि विरोधकांवर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठराल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नात वाढ आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: या राशीच्या पाचव्या स्थानात शनिदेव आहेत. हे गोचर तुमच्यासाठी अनेक बाबतीत उत्तम ठरेल. यावेळी तुम्ही कोणतेही काम कराल. त्यातून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे.
धनु : शनीचा अडीचकी सुरु झाली आहे. येणारा काळ तुमच्यासाठी कटुगोड आठवणींचा ठरेल. कामात काही अडथळे येतील. नोकरीत त्रास होईल.पण वडिलोपार्जित संपत्ती वाढण्याची शक्यता आहे.
मकर : मकर राशीच्या लोकांवरील शनीची साडेसाती संपली आहे. शनिदेवांचं भ्रमण तुमच्या तिसऱ्या घरात होत आहे. या ठिकाणी शनिदेव चांगले परिणाम देतात.
कुंभ : शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. दुसऱ्या स्थानात असून शनिचा रजत पदस्पर्श या राशीसाठी फायदेशीर ठरेल. या राशीचा शनि स्वामी आहे. मार्च महिन्यांतर आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.
मीन : मीन राशीवर शनीच्या साडेसतीचा दुसरा टप्पा सुरू होईल. तुम्हाला या काळात काळजी घ्यावी लागेल. साडेसातीचा तुम्हाला पूर्णपणे फटका बसेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)