Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ, करियरसाठी खुलतील नवे मार्ग

दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे.

Astrology: या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ, करियरसाठी खुलतील नवे मार्ग
राशी भविष्य
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 5:30 AM

Astrology: ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष-  नशीब तुमच्या सोबत आहे. तुम्ही कोणत्याही शुभ कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या गोड बोलण्याने गोड तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. त्याचप्रमाणे तुमच्या हुशारीने आणि बुद्धिमत्तेने आपलं कार्य यशस्वी कराल. कामाच्या क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.
  2. वृषभ- मन प्रसन्न होईल. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवेल. तुम्हाला प्रवासाचा आनंद मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. दिवस चांगला सुरू होईल. तुमच्यात नवीन उत्साह पहायला मिळेल.
  3. मिथुन- कौटुंबिक जीवनाच उतार-चढ़ाव दिसून येतील. परिश्रम आणि समजुतीने आयुष्याला सुखी करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. कामात चांगला आर्थिक लाभ होईल.
  4. कर्क- मन प्रसन्न होईल. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवेल, प्रवासाचा आनंद घ्या. व्यवसायात चांगला फायदा होईल. आरोग्यही चांगलं राहील. परदेशात प्रवास करताना आनंद घ्याल.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- दिवस स्फुर्तीने भरलेला असेल. परिश्रमाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. शेअर बाजारात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आनंद प्रसन्न राहील. प्रेम संबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, म्हणून आपण विचारपूर्वक बोललं पाहिजे.
  7. कन्या- भाग्य तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल. इतरांशी तुमचं बोलणं गोड असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना आपल्याकडे आकर्षित कराल. आपण आपल्या हुशारीने आणि बुद्धिमत्तेने कार्य यशस्वी कराल.
  8. तुला- दिवस फार चांगला जाणार नाही. संघर्षाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. अशा वेळी तुम्हाला नक्कीच कुटूंबाचा पाठिंबा मिळेल. म्हणून धीर सोडू नका आणि पुढील कठीण परिस्थितीचा सामना करा. वडिलांकडून योग्य मार्गदर्शन नक्की घ्या.
  9. वृश्चिक- कोणतंही काम करण्यासाठी घाई करू नका. प्रयत्नांना फळ मिळेल. ज्यांना खेळामध्ये रस आहे त्यांची कामगिरी चांगली असेल. पैशाच्या आगमनाने तुम्हाला आनंद मिळेल. जास्तीत जास्त उत्पन्नाचा प्रयत्न कराल आणि यशस्वी होईल.
  10. धनु- तुमचं मन आज उत्साही असेल. ज्येष्ठांचं मार्गदर्शन केल्यास नफ्यात वाढ होईल. बर्‍याच दिवसांपासून प्रयत्न करत असलेली प्रॉपर्टी मिळवण्यात यश मिळेल. शेजार्‍यांचं सहकार्य फायद्याचं ठरेल.
  11. मकर-  तुमच्या कामाच्या क्षेत्रातील प्रयत्नांमुळे प्रगती होईल. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड यांसारख्या ठिकाणी यश मिळू शकतं. तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता. नोकरीमध्ये तुमची मेहनत कामी येईल.
  12. कुंभ- तुमच्या वेळेचा योग्य वापर केल्याने तुम्हाला फायदा होईल. आपण खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरातील महत्वाच्या कामात मदत कराल.
  13. मीन- एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल आपली विचारसरणी बदलू शकते. उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधीही मिळू शकतात. ऑनलाइन व्यवहारात सावधगिरी बाळगा. करियरसाठी नवे मार्ग खुलतील.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल.
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?.
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर....
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?.
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.