Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी मोठे व्यवहार टाळावे

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना जुने मित्र भेटण्याची शक्यता

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांनी मोठे व्यवहार टाळावे
आजचे राशी भविष्य Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 8:05 AM

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- मोठ्यांचा सन्मान करा. घरातील मोठ्या व्यक्तींकडून संपत्तीचा वारसा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी कामात लक्ष द्या. आजच्या दिवशी अडकलेले सर्व व्यवहार मार्गी लागतील. कोणा जवळच्या व्यक्तीचं मन दुखावू नका. वाद मिटवा.
  2. वृषभ- जोडीदाराचा सन्मान करा. गरीब माणसाला मदत करा. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. आज आर्थिक प्रकरणं मार्गी लागतील. धार्मिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबाला वेळ द्याल.
  3. मिथुन- नोकरी मिळवण्यात यश मिळेल. पाठदुखीची समस्या तुम्हाला सतावेल. लग्नाचे योग आहेत. सद्यस्थिती पाहता भविष्यातील बेत आखत त्या मार्गानं काम करण्यासाठी योग्य वेळ आहे. आताच आराखडा तयार करा, भविष्य घडवण्याची संधी तुमच्या हाती आहे.
  4. कन्या- नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण जरा जास्त असेल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका. शांत चित्ताने एक एक काम मार्गी लावा.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- कामातील काही गोष्टींकडे गांभीर्यानं पाहा, अडकलेले पैसे परत मिळण्याची संधी आहे. वेळ व्यर्थ जाणार नाही याकडे लक्ष द्या.
  7. कर्क- मित्रांकडून सहकार्य मिळेल. भावंडांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. गरजूंना अन्नदान करा. आज आरोद्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे.
  8. तुळ- तुमच्या भागीदारीवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला नवीन नोकरी मिळेल. आईच्या सल्ल्याचे पालन करा. आरोग्याची काळजी घ्या.  धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा.  कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा.
  9. वृश्चिक- नोकरी व्यवसायात बदल करू नका. जुने मित्र भेटतील. मोठे व्यवहार टाळा. आज शक्यतो आराम करा. अधिकचा ताण घेऊ नका. गोष्टी मनाजोग्या होतील फक्त थोडा वेळ द्या.
  10. धनु- व्यापारामध्ये लाभ होणार आहे. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे. आज कुटुंबातील काही व्यक्तींशी चांगला संवाद साधू शकाल.
  11. मकर- वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमची सही कागद पाहिल्यानंतरच करा. प्रवास लाभदायक ठरेल. धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा.  कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा.
  12. कुंभ- नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा ताण जरा जास्त असेल. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका. शांत चित्ताने एक एक काम मार्गी लावा. आरोग्याची काळजी घ्या.
  13. मीन- नोकरीच्या ठिकाणी आजचा दिवस आनंदाचा आहे. धनलाभ होणार आहे. रखडलेले व्यवसाय चालू होतील. ज्येष्ठांचा आशीर्वीद मिळेल. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य मिळेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.