March 2023 : सिंह राशीसाठी 5 ते 8 मार्च 2023 हा कालावधी चढउताराचा, कसं असेल चंद्रबळ
चंद्राचं गोचर अल्पावधीसाठी असलं तरी परिणामकारक असतं. कारण एखादं काम पूर्णत्वास नेण्यास मानसिक बळ मिळणं आवश्यक असतं. चंद्र हा मनाचा कारक असलेला ग्रह आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक ग्रह हा त्याच्या गुणधर्मानुसार फळं देत असतो. कोणत्या ग्रह कोणत्या स्थानात आहे यावरून फलश्रूती निश्चित केली जाते. ज्योतिषशास्त्रात शुभ ग्रह आणि पापग्रह अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यात शनि, मंगळ, राहु आणि केतू हे पाप ग्रह म्हणून गणले जातात. एखादा पापग्रह जवळ आला तर मात्र विपरीत परिणाम दिसून येतो. तर एखादा ग्रह सुर्याच्या जवळ गेला तर अस्ताला जातो. दुसरीकडे चंद्र हा ग्रह कलेकलेने बदलत असतो. शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील चंद्र वेगवेगळी फळ देतो. त्याचबरोबर पापग्रहासोबत युती झाली तर विपरीत परिणाम दिसून येतात. असं असलं तरी चंद्र हा ग्रह सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीत चंद्र सव्वा दोन दिवस राहतो. त्यानंतर मार्गक्रमण करतो.
5 मार्च 2023 रोजी (शुक्रवार) चंद्र ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत रात्री 9:30 मिनिटांनी प्रवेश करेल.या राशीत हा ग्रह 8 मार्च 2023 रोजी 8 वाजून 53 मिनिटांपर्यंत असेल. म्हणजेच सव्वा दोन सिंह राशीत ठाण मांडून असेल. त्यात 6 मार्चला होळी पौर्णिमा संध्याकाळी 4 वाजून 17 मिनिटांनी सुरु होईल आणि 7 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी संपेल. त्यानंतर मात्र चंद्राला उतरती कला लागेल. त्यामुळे सिंह राशीला चढ उतार अनुभवण्यास मिळेल. मानसिक स्थिती अचानक बदल दिसेल.
5 ते 8 मार्च 2023 या कालावधीत कोणताही ग्रह सिंह राशीत नाही. मंगळ वृषभ राशीत, बुध मीन राशीत, गुरु मीन राशीत, शुक्र मीन राशीत, शनि कुंभ राशीत, रवि कुंभ राशीत, राहु मेष राशीत आणि केतु तूळ राशीत आहे. त्यामुळे कोणत्याही ग्रहासोबत युती आघाडी नसेल.
चंद्राने पहिल्या, तिसऱ्या, सहाव्या, दहाव्या आणि अकराव्या स्थानात प्रवेश केल्यास चांगली फळ देतो. बाकी स्थानात चंद्र संमिश्र परिणाम देतो. या काळात काही अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो.
चंद्र गोचर 5 मार्च ते 8 मार्च 2023
- सिंह- पहिलं स्थान (सकारात्मक)
- कन्या – बारावं स्थान (संमिश्र परिणाम)
- तूळ– अकरावं स्थान (सकारात्मक)
- वृश्चिक– दहावं स्थान (सकारात्मक)
- धनु– नववं स्थान (संमिश्र परिणाम)
- मकर – आठवं स्थान (संमिश्र परिणाम)
- कुंभ– सातवं स्थान (संमिश्र परिणाम)
- मीन– सहावं स्थान (सकारात्मक)
- मेष– पाचवं स्थान (संमिश्र परिणाम)
- वृषभ– चौथं स्थान (संमिश्र परिणाम)
- मिथुन– तिसरं स्थान (सकारात्मक)
- कर्क- दुसरं स्थान (संमिश्र परिणाम)
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)