Astrology: पुढच्या सप्ताहात मंगळ करणार गोचर, या चार राशींसाठी ठरणार भाग्याचे
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाच्या संयोगाचा काही राशींच्या जीवनावर शुभ प्रभाव पडतो तर काही राशींवर अशुभ. 10 ऑगस्टला मंगळ राशी परिवर्तनाने कोणकोणत्या राशींना फायदा होईल याबद्दल जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रात (Astrology) मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. मंगळ सध्या मेष राशीत आहे. पण 10 ऑगस्टला मंगळ (Mangal Gochar) मेष सोडून वृषभ राशीत प्रवेश करेल. मंगळ 10 ऑगस्ट रोजी रात्री 9:32 वाजता राशी बदलेल. असे मानले जाते की, ज्यांच्या कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली असते ते शूर आणि निडर असतात. आणि प्रत्येक कामात यशस्वी होतात. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाच्या संयोगाचा काही राशींच्या जीवनावर शुभ प्रभाव पडतो तर काही राशींवर अशुभ. 10 ऑगस्टला मंगळ राशी परिवर्तनाने कोणकोणत्या राशींना फायदा होईल याबद्दल जाणून घेऊया.
- वृषभ- 10 ऑगस्टला मंगळ या राशीत दिसणार आहे. अशा वेळी या राशीसाठ हे गोचर खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यांना नोकरी आणि व्यवसायात बढती मिळणार आहे. या कालावधीत अडकलेले कामे पूर्ण होतील. कोर्टातील वादातून सुटका होईल. शत्रूंचा पराभव करण्यात यश मिळेल.
- कर्क- जातकांसाठीही हे गोचर शुभ राहील. या काळात नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल. शेतात काम करणाऱ्या जातकांच्या कामाचे कौतुक होईल. तसेच पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. पैशाची कमतरता आणि कर्जापासून मुक्ती मिळेल.
- सिंह- राशीच्या जातकांसाठी हे गोचर विशेष फलदायी ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
- धनु- संपत्तीत भरभराट होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात स्वतःहून यश मिळेल. तुम्ही कष्टाळू असल्यामुळे कष्ट करायला मागेपुढे पाहणार नाही. हे तुम्हाला भविष्यात यशाच्या शिखरावर पोहोचण्यास मदत करेल.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)