Astrology: 24 तारखेला या तीन राशींचे भाग्य उजळणार, शुक्र करणार कन्या राशीत प्रवेश
या संयोगाचा तीन राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. आर्थिक लाभासोबतच भौतिक सुखसुद्धा उपभोगायला मिळेल. चला जाणून घेऊया की, कन्या राशीतील शुक्राचे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांवर परिणाम करणार आहे.
Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख, वैभव, सौंदर्य, भोग-विलास, विवाह आणि ऐश्वर्य प्रदान करणारा ग्रह मानला जातो. शुक्रदेव या महिन्यात 24 सप्टेंबर रोजी सकाळी 8:51 वाजता कन्या राशीत म्हणजेच बुधाच्या राशीत प्रवेश करतील, (Venus will enter Virgo) जेथे ते आधीपासून बसलेल्या सूर्यदेवाशी संयोग घडवतील आणि बुधाची प्रतिगामी करतील. या संयोगाचा तीन राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. आर्थिक लाभासोबतच भौतिक सुखसुद्धा उपभोगायला मिळेल. चला जाणून घेऊया की, कन्या राशीतील शुक्राचे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांवर परिणाम करणार आहे.
- वृषभ या राशीचा शासक ग्रह स्वतः शुक्र आहे. शुक्र हा सुख आणि समृद्धी देणारा ग्रह मानला जातो, या कारणास्तव संपत्तीची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दर शुक्रवारी उपवास आणि उपाय केले जातात. या राशीच्या लोकांच्या नशिबात बदल होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. शुक्र कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर या राशीच्या लोकांच्या मनोकामना पूर्ण होतील. मान-सन्मानात वाढ होईल. भौतिक सुखाचा उपभोग घेता येईल. गुंतवणुकीतून चांगले पैसे मिळू शकतात.
- मिथुन तुमचा भाग्योदय होण्याचा योग आहे. उत्पन्नात वाढ होईल. धनलाभामुळे पैशांचा संचय होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. नोकरदार लोकांसाठी हे संक्रमण वरदानापेक्षा कमी नसेल. या राशीच्या लोकांना अचानक कुठूनतरी पैसा मिळू शकतो. कायदेशीर प्रकरणात निकाल तुमच्या बाजूने लागतो. जीवनात आनंद येईल. घर खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल.
- कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी लवकरच सुवर्ण दिवस येणार आहे. प्रत्येक बाबतीत तुमचा विजय होईल. ज्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. करिअरमध्ये नवीन उंची गाठाल. परदेश प्रवासाचे योग आहेत. जुन्या मालमत्तेचा वाद निकाली लागेल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
हे सुद्धा वाचा