Astrology: 15 दिवसात चमकणार या राशींचे नशीब, सूर्यदेवाची होणार कृपा
या राशींवर सूर्य कृपा असेल आणि तो अनेक फायदे देईल. चला जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात सूर्याची कोणती राशी शुभ असेल. सूर्य हा सगळ्या ग्रहांमध्ये शक्तिशाली असतो. कुंडलीमध्ये ज्या स्थानी सूर्य असतो ते ठिकाण अत्यंत प्रभावशाली असते.
ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते कारण सूर्याच्या राशीतील बदलांचा विशेष प्रभाव पडतो. सूर्याच्या (Sun Transit) राशीला संक्रांती म्हणतात. ऑगस्ट महिन्यात, सूर्य 17 ऑगस्ट रोजी सकाळी 07:27 वाजता सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीमध्ये सूर्याची युती काही राशींसाठी अतिशय शुभ राहील. या राशींवर सूर्य कृपा असेल आणि तो अनेक फायदे देईल. चला जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात सूर्याची कोणती राशी शुभ असेल. सूर्य हा सगळ्या ग्रहांमध्ये शक्तिशाली असतो. कुंडलीमध्ये ज्या स्थानी सूर्य असतो ते ठिकाण अत्यंत प्रभावशाली असते. याशिवाय सूर्यासोबत इतर ग्रह जर एकत्र असेल तर दुसऱ्या ग्रहाचा प्रभाव नाहीसा होतो.
सूर्यदर्शन ठरेल लाभदायक
- कर्क- सूर्य सध्या कर्क राशीत असून 17 ऑगस्टनंतर तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश हा कर्क राशीसाठी शुभ ठरेल. कर्क राशीच्या लोकांनी मितभाषी राहिल्यास फायदा होईल. कार्यालयीन ठिकाणी वरिष्ठांशी संबंध सुधारतील. याचा नोकरीत फायदा होईल. नोकरीत बदल करण्यासाठी हा योग्य काळ आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. अडकलेले पैसे सहज मिळतील.
- तूळ- ऑगस्टमध्ये सूर्याचे राशी बदल तुळ राशीलाही चांगले परिणाम देतील. या जातकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. उत्पनाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. सूर्याच्या दर्शनामुळे या राशीच्या व्यापाऱ्यांना भरघोस नफा मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होण्याचीही शक्यता आहे.
- वृश्चिक- ऑगस्ट रवि वृश्चिकांसाठी चांगली बातमी घेऊन येईल. विशेषत: करिअरच्या बाबतीत तुम्हाला मोठे यश मिळू शकते. ज्यांना बढती हवी आहे त्यांची इच्छा पूर्ण होईल. नवीन नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या लोकांना वाट पाहण्याची गरज नाही. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. एकंदरीत, हा काळ सर्वच दृष्टीने चांगला राहील.
गोचर म्हणजे काय?
गो म्हणजे ग्रह चर म्हणजे चालणे.भविष्य सांगण्यासाठी व भविष्याचा कालावधी सांगण्यासाठी याचा उपयोग होतो. कृष्णमुर्ती पध्दतीनुसार रविचे भ्रमण संबधीत महादशा स्वामीच्या राशीतुन व अतर्दंशा स्वामीच्या नक्षत्रातुन व विदशा स्वामीच्या उप-नक्षत्रातुन होतांना घटना होत असतात.
पारंपारिक पध्दतिनुसार चंद्राचे भ्रमण कुंडलीतुन पाहिले जाते. असे भ्रमण चंद्रा पासुन पाहिले जाते. रविचे भ्रमण जन्म चंद्रापासुन 3-6-10 या स्थानी शुभ फ़ल मिळते चंद्र जन्म राशी पासुन 1-3-6-7-10 स्थानी शुभ फ़ल देतो. मंगळ चंद्रा पासुन3-6 स्थानी शुभ फ़ल देतो.
गुरु मुळ कुंडलीतील चंद्रा पासुन 2-5-7-9 ,शुक्र 1-2-3-4-5-8-9-11-12 या स्थानी , शनि ३-६ स्थानी, तसेच राहू-केतू चंद्रापासुन 3-6-10 या स्थानी असता शुभ फ़ले मिळतात. कुठल्याही ग्रहाची गोचर भ्रमणे ही जन्मलग्ना पासुनच पहावी. चंद्राचे भ्रमण महादशा स्वामीच्या राशीतुन व अंतर्दशा स्वामीच्या नक्षत्रातुन किंवा अंतर्दशा स्वामीच्या राशीतुन व महादशा स्वामीच्या नक्षत्रातुन होत असल्यास शुभ फ़लदायी होते व असे दिवस लाभदायी ठरतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)