Astrology: पुढचे 23 दिवस ‘या’ राशींसाठी खूपच खास, बुध ग्रहाची होणार कृपा
कन्या राशीमध्ये पुढील 23 दिवस बुध ग्रह उलट दिशेने प्रवास करेल. 10 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीत बुध ग्रहाचे हे मार्गक्रमण असेल. बुधाची चाल बदलल्याने अनेक राशीच्या (Horoscope) लोकांच्या जीवनात मोठे बदल घडेल.
Astrology: ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह (Mercury) आजपासून उलटी चाल चालणार आहे. बुधाची चाल बदलल्याने अनेक राशीच्या (Horoscope) लोकांच्या जीवनात मोठे बदल घडेल. पूर्वी बुध कन्या राशीत होता आणि आज सकाळी 9.30 वाजता कन्या राशीत प्रतिगामी झाला आहे. म्हणजेच कन्या राशीमध्ये पुढील 23 दिवस बुध ग्रह उलट दिशेने प्रवास करेल. 10 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीत बुध ग्रहाचे हे मार्गक्रमण असेल. चला जाणून घेऊया बुध ग्रहाच्या प्रतिगामी संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर काय परिणाम होईल.
- मेष – मेष राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खूप खास असणार आहे. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. कामात प्रगती होईल. प्रियजनांबद्दल प्रेम वाढेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल. मनही प्रसन्न राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या काळात आरोग्याबाबत जागरूक राहा. भगवान शिवाची आराधना करा.
- कर्क – पूर्वी केलेल्या मेहनतीचा लाभ मिळेल. व्यवसायात विशेष लाभ होईल. कोणावरही अंध विश्वास ठेवू नका. एखाद्यावर अंध विश्वास ठेवल्याने तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. मोठा निर्णय घेण्याआधी विचार करा. आरोग्याबाबत जागरूक राहा. बाहेरचे अन्न खाणे टाळावे. हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण करा. येणाऱ्या काळात अर्थार्जनाचे मार्ग खुलतील.
- कन्या- कन्या राशीमध्ये बुध ग्रह उलट प्रवास करेल. त्यामुळे या राशीवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. तुम्ही फक्त तुमच्या शब्दांनी लोकांची मने जिंकाल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. कन्या राशीत प्रतिगामी गोचर करताना बुध भद्रा योग तयार करीत आहे. यामुळे या राशीचे लोकं कार्यक्षम धोरण अवलंबू शकतील. या काळात तुम्हाला बढती मिळू शकते.
- तूळ – बुधाची उलटी हालचाल तुळ राशीसाठी नकारात्मक ठरू शकते. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुमचा राग वाढू शकतो. तुमचे बोलणे लोकांना वाईट वाटू शकते. तुमच्या कुटुंबातील सदस्य आजारी पडू शकतात. आजारांवर भरपूर पैसा खर्च होऊ शकतो. धैर्याने काम केले तर प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. भगवान सूर्याची उपासना केल्याने तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)