Astrology: 16 जुलैला कर्क राशीत होणार सूर्याचा प्रवेश; ‘या’ राशींना होणार फायदा
ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) दर महिन्याला सूर्य आपली राशी बदलतो. सूर्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी 30 दिवस लागतात. 16 जुलै रोजी पुन्हा एकदा सूर्य राशी परिवर्तन करणार आहे. कर्क राशीत सूर्य प्रवेश करणार असून या राशीत 17 ऑगस्टपर्यंत असेल. सूर्य ग्रहाच्या या गोचराचा प्रभाव सर्व 12 राशींवर होईल. काही राशींवर शुभ तर काहींवर अशुभ परिणाम […]
ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) दर महिन्याला सूर्य आपली राशी बदलतो. सूर्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी 30 दिवस लागतात. 16 जुलै रोजी पुन्हा एकदा सूर्य राशी परिवर्तन करणार आहे. कर्क राशीत सूर्य प्रवेश करणार असून या राशीत 17 ऑगस्टपर्यंत असेल. सूर्य ग्रहाच्या या गोचराचा प्रभाव सर्व 12 राशींवर होईल. काही राशींवर शुभ तर काहींवर अशुभ परिणाम होईल. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचा हा राशी बदल 3 राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
- मेष – ज्योतिषशास्त्रानुसार 16 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल. मेष राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण भाग्याचे ठरणार आहे.नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि वेतनवाढ मिळू शकते. एवढेच नाही तर तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. तुम्ही व्यवसाय इत्यादीमध्ये मोठा करार निश्चित करू शकता.
- वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठीही हा काळ अतिशय शुभ राहील. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायाशी संबंधित लाभ होण्याची शक्यता आहे.
- वृश्चिक- ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांचे नशीब देखील सूर्यासारखे चमकेल. सूर्याचे राशी परिवर्तन शुभ काळ घेऊन येणार आहे. या काळात या राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. पगारदारांना या काळात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या लोकांना फायदा होईल.
या 3 राशींची शनीच्या तावडीतून सुटका होईल
शनि मकर राशीत प्रवेश करताच कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शनिच्या तावडीतून मुक्ती मिळेल. दुसरीकडे मीन राशीचे लोक शनि सती सतीपासून मुक्त होतील. मात्र केवळ 6 महिन्यांसाठी या राशींना शनीच्या प्रकोपापासून आराम मिळेल. 17 जानेवारी 2023 पासून या राशीच्या लोकांवर पुन्हा शनीची दशा येईल.
या 3 राशीवर असेल प्रभाव
जिथे एकीकडे कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शनिधाऱ्यापासून मुक्ती मिळेल. दुसरीकडे, 12 जुलैपासून मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर शनिढय्या येणार आहेत. तर धनु राशीच्या लोकांवर शनी सतीचा प्रभाव सुरू होईल. तथापि, हे केवळ 6 महिन्यांसाठी होईल. 17 जानेवारीपासून या तिन्ही राशी शनीच्या दशापासून पूर्णपणे मुक्त होतील.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)