AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti: चाणाक्य नितीनुसार ‘या’ चार सवयी माणसाला कधीच यशस्वी होऊ देत नाही?

चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की, मानवामध्ये अशा 4 वाईट सवयी आहेत, ज्या त्यांना यशस्वी होण्यापासून रोखतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 वाईट सवयी, ज्या माणसाने लगेच सोडणे आवश्यक आहेत.

Chanakya Neeti: चाणाक्य नितीनुसार 'या' चार सवयी माणसाला कधीच यशस्वी होऊ देत नाही?
चाणक्य नीती Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 19, 2023 | 3:58 PM
Share

मुंबई, जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने कठोर परिश्रम करतो. पण ते सगळेच यशस्वी होतत असं नाही. प्रयत्न करूनही अनेकांना निराशेला सामोरे जावे लागते. आयुष्यात काही गोष्टी किंवा चुका सफलतेमध्ये बाधा बनत असतात. आचार्य चाणक्य (Chanakya Neeti) यांनी या चुकांचे तपशीलवार वर्णन केले आहे. चाणक्य नीतीमध्ये असे म्हटले आहे की, मानवामध्ये अशा 4 वाईट सवयी आहेत, ज्या त्यांना यशस्वी होण्यापासून रोखतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 4 वाईट सवयी, ज्या माणसाने लगेच सोडणे आवश्यक आहेत.

पैशांचा गैरवापर

चाणक्य नीतीनुसार, माणसाने त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या पैशांचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. जे इतरांचे नुकसान करण्यासाठी पैशाचा चुकीचा वापर करतात, त्यांची प्रतिमा ढोंगी अशी बनते. असे लोकं आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. माता लक्ष्मी देखील अशा लोकांपासून दूर जाते.

भेदभावाची सवय

आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीमध्ये कधीही भेदभावाची भावना नसावी. अशी चुकीची विचारसरणी ठेवणारे लोकं आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. असे लोकं स्वतःच्या अहंकारात राहतात, ज्यामुळे इतर लोकं त्यांच्यापासून दूर राहतात. अशा लोकांना समाजात कधीच मान मिळत नाही.

वाईट आणि चुकीची संगत

चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, व्यक्तीने कधीही वाईट संगत करू नये. अशी संगत माणसाला वाईट आणि अधोगतीच्या मार्गावर घेऊन जाते. या चुकीच्या संगतीचा आजपर्यंत कोणालाच फायदा झालेला नाही. अशा सहवासामुळे, तो कुटुंब आणि मित्र आणि नातेवाईकांचा आधार देखील गमावतो.

राग आणि लोभ

आचार्य चाणक्य म्हणतात की, मनुष्याने लोभ आणि क्रोधापासून दूर राहिले पाहिजे. हे दोघे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जे लोक या दोन वाईट सवयींकडे आकर्षित होतात, त्यांचे आयुष्य नरकापेक्षाही वाईट व्हायला वेळ लागत नाही. अशा लोकांपासून यश नेहमीच दूर पळते.

सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.