Horoscope 12 May 2022: कामं वेळेवर पूर्ण करा, यश मिळाल्याने मन आनंदी
आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.
मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.
तुळ –
आज घराबाहेर पडून कामावर लक्ष देण्याचा दिवस आहे. कामं नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करा. मनाप्रमाणे यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील आणि उत्पन्नाचे साधन मजबूत राहील. आळसाला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका, यामुळे यश हाताबाहेर जाऊ शकते. यासोबतच तुमच्या मनात विनाकारण राग आणि चिडचिडेपणा जाणवेल. घरात बनवलेल्या सुधारणेच्या योजनांचा पुनर्विचार अवश्य करा. व्यवसायाशी संबंधित कोणत्याही कामात इतरांवर अवलंबून राहू नका आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कार्यालयात उच्च अधिकार्यांशी वाद सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
लव फोकस – जीवनसाथी आणि कुटुंबाशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. फक्त तुमचा उत्साही स्वभाव आणि आवड नियंत्रित करा. तुमच्या जोडीदाराचा सल्ला जरूर घ्या.
खबरदारी – काहीवेळा काही नकारात्मक विचार मनात येऊ शकतात. तसेच महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
शुभ रंग – गुलाबी
भाग्यवान अक्षर – स
अनुकूल क्रमांक – 3
वृश्चिक –
तुमच्या दैनंदिन जीवनात ज्या प्रकारचा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहात ते तुमच्यासाठी सकारात्मक आणि फायदेशीर ठरेल. मालमत्तेशी संबंधित व्यवहाराच्या कामात फायदेशीर व्यवहार होऊ शकतो, त्यामुळे या कामांमध्ये आपले लक्ष द्या. या काळात आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. परंतु काही जुन्या नकारात्मक गोष्टी वाढल्यामुळे जवळच्या नातेवाईकाशी संबंध बिघडू शकतात. त्यामुळे तुमच्या विचारांवर चितंन करत राहा. विद्यार्थीही त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. व्यावसायिक बाबतीत अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्यक घ्या. आज तुम्हाला कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना त्रास होईल. आज सरकारी नोकरांना कामाच्या अतिभारामुळे ओव्हरटाईम करावा लागू शकतो.
लव फोकस – प्रेमसंबंधांमध्ये तुमच्या रागामुळे भावनिक अंतर येऊ शकते. व्यवहारात नम्र वागा. जोडीदाराचे सहकार्य तुमचे मनोबल वाढवेल.
खबरदारी – स्वभावातील चिडचिडेपणामुळे तुम्हाला थकवा आणि सुस्तपणा जाणवेल. ध्यान आणि योगासनांकडे अधिक लक्ष द्या. शुभ रंग – गुलाबी
भाग्यवान अक्षर – न
अनुकूल क्रमांक – 2
धनु –
आज घरातील काही नूतनीकरण आणि सजावटीसंदर्भात काही चर्चा होईल. आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असेल. पण कोणतेही काम करण्यापूर्वी तुम्ही त्याचे बजेट तयार केले पाहिजे, तरच आर्थिक अडचणीतून तुमची सुटका होईल.
कोणतेही काम करताना लक्ष ठेवा. कारण चोरी किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता आहे. जवळच्या नात्यातील वादामुळे मनात चिंता राहील. आर्थिक परिस्थितीबाबत मनात थोडी भीती निर्माण होईल.
लव फोकस – घर आणि कुटुंबात वर्तनुकीत संयम ठेवा. कारण तुमच्या असभ्य वागण्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमसंबंधात मधुरता राहील.
खबरदारी – तणावामुळे पचनसंस्था बिघडेल. कारण आपल्या रूक्ष वागण्याने तनावाचे वातावरण निर्माण होईल. प्रेम प्रकरणात चांगले वातावरण राहील.
शुभ रंग – बदामी
भाग्यवान अक्षर – म
अनुकूल क्रमांक – 2