Sadesati : शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी करा हा उपाय
Shani sadesati effect : शनीची साडेसाती सुरु झाली की त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. हा प्रभाव कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहे. हे उपाय करुन तुम्ही साडेसातीचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करु शकता. कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊयात.
Shani sadesati : शनिदेवाला न्यायदेवता म्हणून पूजले जाते. शनी हा व्यक्तीला कर्मानुसार फळ देत असतो. शनिदेवाला कर्माचे फळ देणारे देखील म्हटले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात शनीची साडेसाती सुरू होते तेव्हा त्या व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतात. हा प्रवास तीन घरांमध्ये सुरू असतो. त्याचा संपूर्ण कालावधी साडेसात वर्षांचा असते. म्हणून या संक्रमणाला शनीची साडेसती असे म्हणतात.
साडेसाती सुरु असताना काय करावे उपाय
शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण केले जाते. शनीच्या साडेसातीचा प्रभाव टाळण्यासाठी लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल घेऊन. त्यानंतर या तेलात तुमचा चेहरा दिसल्यानंतर हे तेल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. तुम्हाला हवे असल्यास हे तेल तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली देखील ठेवू शकता.
लोखंडी भांडी दान करा
लोह उपायांचा अवलंब केल्याने तुम्हाला साडे सातीच्या प्रभावापासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी लोखंडी भांडीही दान केली जातात. अशा परिस्थितीत तुम्ही तवा, कढई इत्यादी लोखंडी स्वयंपाकाची भांडी एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावी. असे केल्याने तुमच्या कुंडलीत अपघात होण्याची शक्यता टळते.
पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा
दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्या झाडाला २१ वेळा प्रदक्षिणा घातल्याने माणसाला शनिदेवाच्या साडेसातीच्या दुष्परिणाम भोगावे लागत नाहीत. यासोबतच पिंपळाच्या झाडाला अर्घ अर्पण केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात. जर तुम्हाला मूल होण्यात अडथळे येत असतील तर यासाठी पिंपळाचे झाड लावावे.
अस्वीकरण: ‘या लेखात दिलेल्या माहितीत अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ज्योतिषी/पंचांग/उपदेश/श्रद्धा/धार्मिक शास्त्रांमधून गोळा करून तुमच्यासमोर सादर केली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती प्रदान करणे आहे. कोणत्याही समस्येसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.