Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चुकीला माफी नाही’, तुम्ही त्यांना नडले की संबंध तोडलेच म्हणून समजा, 5 राशींच्या व्यक्तींपासून जरा जपून

आयुष्याच्या वळणावर आपली साथ कोण कधी सोडून जाईल हे कोणी सांगू शकत नाही. पण काही लोक त्यांच्या तत्वाना घेऊन खूपच सजग असतात. त्याच्या आयुष्यात माफी हा शब्दच नसतो. राशीचक्रातील 5 राशींच्या व्यक्तींच्या आत्मसन्मानाला जर कोणी धक्का दिला तर त्या व्यक्तीला ते आपल्या आयुष्यातून ही काढायला मागे पुढे पाहात नाही.

'चुकीला माफी नाही', तुम्ही त्यांना नडले की संबंध तोडलेच म्हणून समजा, 5 राशींच्या व्यक्तींपासून जरा जपून
Zodiac
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 8:05 AM

मुंबई : आयुष्याच्या वळणावर आपली साथ कोण कधी सोडून जाईल हे कोणी सांगू शकत नाही. पण काही लोक त्यांच्या तत्वांना घेऊन खूपच सजग असतात. त्याच्या आयुष्यात माफी हा शब्दच नसतो. राशीचक्रातील 5 राशींच्या व्यक्तींच्या आत्मसन्मानाला जर कोणी धक्का दिला तर त्या व्यक्तीला ते आपल्या आयुष्यातून ही काढायला मागे पुढे पाहात नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या राशी.

1. कुंभ जे लोक सहजपणे खोटे बोलतात किंवा आपल्या प्रियव्यक्तीला फसवतात त्यांना या राशीची माणसे सहन करू शकत नाहीत. जर त्यांचा जोडीदार त्यांच्याशी खोटे असेल तर, कुंभ राशीच्या व्यक्ती जोडीदाराला सोडण्यास क्षणाचाही विलंब लावणार नाही पण जर त्यांच्या जोडीदाराने चुकीची माफी मागितली तर ते त्यांना माफ केल्यासारखे वागू शकतात, पण त्यांची चुकी ते कधीच विसरणार नाहीत.

2. सिंह सिंह राशीचे लोक सामान्यत: लोकांप्रती खूप दयाळू असतात. पण जे त्याच्या दयेला पात्र नाहीत अशा व्यक्तीसोबत ते एकनिष्ठ राहात नाही. सिंह राशीच्या व्यक्ती दुसरी संधी देण्यावर विश्वास ठेवत नाही. त्याच्या आयुष्यात चुकीला माफी नसते.

3. वृश्चिक वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा जर कोणी विश्वासघात केला तर या राशीच्या व्यक्ती त्या माणसाला आपल्या आयुष्यातून काढून टाकतात. हे करताना ते मागचा पुढचा कोणताच विचार करत नाही. या राशीचे लोक सर्व काही अगदी वैयक्तिकरित्या घेतात. समोरच्या व्यक्तीच्या छोट्या चुकांमुळे देखील ते दुखवले जातात. जरी वृश्चिक राशीचे लोक एकनिष्ठ लोक असले तरी ते जास्त काळ संबंध ठेवू शकत नाहीत, माफी देण हा प्रकारच त्यांना माहीत नसतो.

4. वृषभ वृषभ राशीचे लोक अत्यंत निष्ठावान असतात. या राशीचे लोक आहेत आपल्या प्रिय व्यक्तीने दिलेले दु:ख सहन करू शकत नाहीत. जर त्यांच्या प्रिय व्यक्तींनी कोणती चुक केली तर त्या सर्व गोष्टींचा विचार करुन व्यक्तीला क्षमा करावी की नाही या निष्कर्षापर्यंत पोहोचतात. पण बहुतेक वेळा,उत्तर नकारात्मक येते.

5. मेष मेष राशीच्या व्यक्तीला विश्वासघात झाल्यासारखे वाटत असेल तर ती व्यक्ती तुम्हाला कधीही माफ करु शकत नाहीत.ते एखाद्या व्यक्तीला सहजपणे माफ करणार नाहीत, बहुतेक वेळा त्यांना त्यांच्या आयुष्यातून काढून टाकतील. विश्वासघात करणाऱ्या लोकांसाठी वेळ, शक्ती आणि मेहनत वाया घालवणे योग्य नाही असे त्यांना वाटते.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

हे ही वाचा :

शूज, बॅग, अ‍ॅक्सेसरीज आणि मेकअपपर्यंत सर्वकाही मॅचिंग, 4 राशींच्या लोकांचे पैसे शॅपिंग करण्यातच खर्च, तुमची रास यामध्ये आहे का?

आग लगे बस्ती मैं, मैं अपनी मस्ती मैं या स्वभावाची असतात ही लोक, जाणून घ्या तुमची रास यामध्ये आहे का?

लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा.
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना
वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना.
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य
मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य.
"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट.
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?
राज्यात अवकाळी पावसाचा कहर, 'या' जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट?.
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?
पंकजा मुंडे यांच्या फाईली धनुभाऊंनीच नेल्या अंजली दमानियांच्या दारी?.
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.