Gudi Padwa 2025: गुढीपाडव्याच्या दिवशी नशीब चमकणार! ‘या’ ५ राशींचा सुवर्ण काळ सुरु होणार
Gudi Padwa 2025: हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते. आता या नवीन वर्षात कोणत्या राशींचे नशीब चमकणार चला जाणून घेऊया...

काही दिवसांवर गुढीपाडवा हा सण आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गुढी पाडवा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा केल्या जाणाऱ्या या सणाला हिंदू नववर्ष सुरु होते. यावर्षी ३० मार्च रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवसाचा काही राशींवर प्रभाव पडणार आहे. काही राशींसाठी हा शुभ आणि भाग्याचा काळ ठरणार आहे. कोणत्या राशींचा सुर्वण काळ सुरु होणार? चला जाणून घेऊया…
हिंदू धर्मग्रंथानुसार ब्रह्मदेवांनी पाडव्याच्या दिवसापासून विश्वाची निर्मिती सुरू केली. या दिवशी गुढीचा कलश आणि कपड्यांनी सजवलेला ध्वज घराबाहेर लावला जातो. हे विजयाचे प्रतिक मानले जाते. गुढीपाडवा हा सण नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात मानला जातो. कारण, या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवीन ऊर्जा आणि उत्साह पसरवतात.
कोणत्या राशिंचा सुवर्णकाळ सुरु होणार?
गुढीपाडवा हा दिवस चैत्र महिन्यात शुक्ल पक्षातील प्रतिपदेला, नवसंवत्सर म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी विक्रम संवत आणि शक संवत सुरू होऊन नवीन वर्ष सुरू होते. त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवसाच्या ग्रहस्थितीचा परिणाम हा वर्षभर असतो. आरोग्य, करिअर, संपत्ती आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित संकेत या दिवशी दिले जातात. आता या दिवशी कोणत्या राशींचा सुर्वण काळ सुरु होणार चला जाणून घेऊया…
वाचा: सावधान! होळीनंतर ‘या’ ३ राशींचे होणार नुकसान, राहू-केतू भारी पडणार
मेष
गुढीपाडव्याचा मेष राशीवर मोठा प्रभाव पडणार आहे. कारण, या राशीवर सूर्य आणि मंगळाचा प्रभवा होणार आहे. या राशीच्या लोकांना नवीन संधी मिळणार आहेत. त्यांना करिअर आणि व्यवसायात देखील यश मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या या राशींचा खूप चांगला काळ सुरु होणार आहे. या राशीच्या लोकांनी केलेली गुंतवणुक फलदायक ठरणार आहे.
कर्क
कर्क राशीवर चंद्र गुढीपाडव्याचा चांगला प्रभाव पडणार आहे. सकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला नवीन संधी मिळणार आहेत. विविध क्षेत्रात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती मिळेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द वाढेल. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर करा. कारण हा तुमचा सर्वोत्तम काळ सुरु होणार आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा शुभ आणि भाग्याचा ठरणार आहे. सूर्य या राशीच्या अधिपती ग्रह. त्यामुळे जीवनात नवीन प्रकाश येणार आहे. समाजात मान सन्मान मिळेल. व्यापाऱ्यांसाठी नवे सौदे फायद्याचे ठरणार आहेत. जुन्या कर्जातून सुटका होण्याची शकता आहे. तुम्हाला नवीन उर्जा आणि उत्साह मिळेल, जो तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेईल.
वृश्चिक
या राशीच्या लोकांवर मंगळाची कृपा असणार आहे. त्यामुळे करिअर आणि व्यवसायात यश मिळणार आहे. तुमचे उपन्न अचानक वाढणार आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. कौटुंबित सहकार्य लाभेल. जुने वाद मिटण्याची शक्यत आहे.
धनू
ज्योतिषशास्त्रानुसार, गुढीपाडव्याचा सण हा धनु राशींच्या लोकांसाठी खूप शुभ आणि भाग्याचा ठरणार आहे. गुरू हा धनु राशीचा अधिपती ग्रह आहे. त्यामुळे या दिवसापासून धनू राशीच्या लोकांवर गुरुंचे विशेष आशीर्वाद असणार आहेत. नव्या संधी मिळणार. करिअरमध्ये चांगले यश प्राप्त होईल. तुम्ही फक्त आत्मविश्वास वाढवा आणि इतरांना मदत करण्यापासून मागे हटू नका. आरोग्य देखील चांगले राहिल.