Horoscope: येणारे सहा महिने ‘या’ राशींसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे!
जोतिष्यशास्त्रामध्ये (Astrology) शनीच्या संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. शनीच्या संक्रमणामुळे (Shani transit) सगळ्याच राशींवर परिणाम होतो. अडीच वर्षाने शनि एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये संक्रमण करतो. शनी हा सर्वात संथ चालणारा ग्रह आहे. म्हणून, सर्व 12 राशींमध्ये संक्रमण होण्यासाठी त्याला 30 वर्षे लागतात. यावेळी शनि कुंभ राशीत असून प्रतिगामी स्थितीत आहे. 29 एप्रिल रोजी शनिने 30 वर्षांनी […]
जोतिष्यशास्त्रामध्ये (Astrology) शनीच्या संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. शनीच्या संक्रमणामुळे (Shani transit) सगळ्याच राशींवर परिणाम होतो. अडीच वर्षाने शनि एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये संक्रमण करतो. शनी हा सर्वात संथ चालणारा ग्रह आहे. म्हणून, सर्व 12 राशींमध्ये संक्रमण होण्यासाठी त्याला 30 वर्षे लागतात. यावेळी शनि कुंभ राशीत असून प्रतिगामी स्थितीत आहे. 29 एप्रिल रोजी शनिने 30 वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश केला. आता तो 12 जुलै रोजी प्रतिगामी गतीने मकर राशीत प्रवेश करेल. शनिचे प्रतिगामी भ्रमण सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडेल. त्याच वेळी, तीन राशींच्या लोकांना लाभ मिळेल. शनि पुढील 6 महिने मकर राशीत राहील. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींना फायदा होईल.
- मेष- शनिच्या प्रतिगामी संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये प्रचंड प्रगती होऊ शकते. त्यांना मोठे पद मिळू शकते. नवीन नोकरी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. धनलाभ होईल. उत्पन्नात प्रचंड वाढ होईल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. असे म्हणता येईल की पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.
- वृषभ- वृषभ राशीच्या लोकांना शनि संक्रमण भरपूर धन मिळवून देईल. त्यांची आर्थिक स्थिती चांगली राहील. अनेक ठिकाणाहून पैसे मिळतील. गुंतवणुकीतून लाभ होईल. काही लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यावसायिकांसाठीही वेळ लाभदायक आहे. ते व्यवसाय वाढवण्यासाठी गुंतवणूक करू शकतात.
- वृश्चिक- प्रतिगामी शनिचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देईल. नोकरी-व्यवसायात लाभ होईल. उत्पन्न वाढेल. नवीन स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल. एकूणच त्यांच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल. व्यापारी मोठे सौदे करू शकतात. हा काळ पदोन्नती, पैसा, प्रतिष्ठा सर्वकाही घेऊन येईल. वाद-विवादामध्ये विजय मिळेल.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)