Numerology Today 19, November| अद्भुत क्षमता, मोहक व्यक्तिमत्व सर्वकाही असताना अशांत असतात शुभ अंक 07 असणारी लोक, जाणून घ्या या अंकाचे रहस्य
अंकशास्त्रात 07 हा अंक खूप महत्त्वाचा आहे . कोणत्याही महिन्याच्या 07, 16 आणि 25 तारखेला ज्याचा जन्म झाला आहे त्यांचा शुभ अंक 07 असतो. या अंकाचा स्वामी नेपच्यून म्हणजेच वरुण देवता आहे .

मुंबई : अंकशास्त्रात 07 हा अंक खूप महत्त्वाचा आहे . कोणत्याही महिन्याच्या 07, 16 आणि 25 तारखेला ज्याचा जन्म झाला आहे त्यांचा शुभ अंक 07 असतो. या अंकाचा स्वामी नेपच्यून म्हणजेच वरुण देवता आहे. या अंकाच्या व्यक्तींना असे वाटू शकते की सध्या तुमची प्रगती ज्या गतीने व्हायला हवी त्या गतीने होत नाही, परंतु ज्या क्षणी तुम्ही स्वतःची ओळख होईल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्यापेक्षा भाग्यवान कोणी नाही.
अतिसंवेदनशील
शुभ अंक 07 असणाऱ्या लोकांमध्ये अशी अद्भुत क्षमता असते. की ते त्यांच्या अतिसंवेदनशील ज्ञानाद्वारे समोरच्या व्यक्तीचे मन जाणून घेतात. ही प्रतिभा शुभ अंक 07 असणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त असते.
या व्यक्तींना प्रवास करायला आवडतो
शुभ अंक 07 असलेले लोक सतत काहीतरी विचार करत असतात . त्यांचे व्यक्तिमत्व देखील इतर लोकांपेक्षा वेगळे आहे . ते अस्वस्थ स्वभावाचे असतात. त्यांना प्रवास करायला खूप आवडते . शक्य असल्यास संपूर्ण जग फिरायला सुद्धा ते मागे पुढे पाहणार नाहीत.
मोहक व्यक्तिमत्व
शुभ अंक 07 असणाऱ्या एखादी व्यक्ती तुम्हाला एकदा भेटली की तो तुम्हाला कधीही विसरू शकत नाही . ज्यांना 07 गुण आहेत ते अनेकदा यशस्वी लेखक , चित्रकार आणि कवी बनतात . या लोकांना त्यांच्या मित्रांकडून नेहमीच पाठिंबा मिळतो . जे लोक शुभ अंक 07 असलेल्या लोकांच्या संपर्कात येतात त्यांचे नशिब सुद्धा बदलू लागते.
मूलांक 07 साठी शुभ दिवस
शुभ अंक 07 असलेल्या लोकांनी महत्त्वाचे काम कोणत्याही महिन्याच्या 07 , 16 आणि 25 तारखेला करावे . विशेषत: जेव्हा या तारखा 21 जून ते 22 जुलै दरम्यान येतात . रविवार , सोमवार आणि बुधवार हे दिवस तुमच्यासाठी शुभ ठरतील .
या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
शुभ अंक 07 असणारे लोक मोठे जोखीम घेणारे आणि खूप मेहनती असतात , परंतु कधीकधी त्यांची मेहनत व्यर्थ जाते . अशा परिस्थितीत, त्यांनी नेहमी योग्य दिशेने प्रयत्न करणे आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे . 07 अंक असलेल्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात . मानसिक श्रमासोबत शारीरिक श्रम करा . वेळेचा आदर न करणे ही तुमची सर्वात मोठी कमतरता आहे , म्हणून नेहमी तुमचा वेळ व्यवस्थापित करा. इतरांवर अवलंबून राहणे टाळा.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.)
इतर बातम्या
यशाच्या शोधात आहात? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 2 गोष्टी आत्मसात करा
Vastu Tips | हातात पैसा टिकत नाहीय? वास्तुशास्त्रानुसार ही 5 झाडे घरात लावा पैसाच पैसा येईल
या मंदिरांमध्ये पाळला जातो ड्रेस कोड; योग्य पोशाख नसेल तर…https://t.co/1yxFKThbi6#believes| #females| #Hindu | #temple | #Temple
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2021