Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Billionaires Zodiac Sign : या दोन राशींचे लोक सर्वाधिक होतात अब्जाधीश; या एका राशीच्या वाट्याला आहे निराशा, तुमची कोणती आहे रास?

या संशोधनानुसार, 50 अब्जाधीशांच्या यादीत सर्वाधिक म्हणजे 4 जणांचा जन्म 1957 मध्ये झाला होता.

Billionaires Zodiac Sign : या दोन राशींचे लोक सर्वाधिक होतात अब्जाधीश; या एका राशीच्या वाट्याला आहे निराशा, तुमची कोणती आहे रास?
राशिचक्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 8:46 PM

Billionaires Zodiac Sign : आपण दररोज वृत्तपत्रात किंवा मोबाईलवर अशा अनेक बातम्या वाचत असतो की त्याला लॉटरी लागली. ह्याला जॅकपॉट लागला किंवा जगातील हा श्रीमंत व्यक्ती (Wealthy people) वगैरे वगैरे. पण या बातम्या वाचल्या की आपल्यालाही असे वाटते की आपण ही श्रीमंत व्हावे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला पैसा कमवायचा असतो. यासाठी तो रात्रंदिवस मेहनत करतो. जेणेकरून तो स्वत:ला सक्षम बनवू शकतो आणि करोडपती किंवा अब्जाधीश होऊ शकतो. काही लोकांचा असा विश्वास आहे की करोडपती (millionaires) किंवा अब्जाधीश होण्यासाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि नशीब देखील आवश्यक आहे. नुकतेच एक संशोधन झाले आहे, ज्यामध्ये जगातील 50 अब्जाधीशांची रक्कम किती आहे हे सांगण्यात आले आहे. या रकमेच्या आधारे अंदाज लावला जाऊ शकतो की अब्जाधीश होण्याची शक्यता किती आहे. ऑनलाईन बेटिंग साइट Time2Play ने जगातील 50 श्रीमंत लोकांवर हे संशोधन केले आहे. या संशोधनानुसार अब्जाधीशांमध्ये सामान्य गोष्टी आढळून आल्या. या संशोधनात अब्जाधीशांचा वाढदिवस, जन्म वर्ष यांचीही माहिती समोर आली आहे.

या राशीच्या लोकांना अब्जाधीश होण्याची अधिक शक्यता

अब्जाधीशांवर केलेल्या संशोधनानुसार, 50 अब्जाधीशांपैकी 8 लोक तूळ, 8 मेष, 5 लोक सिंह, 5 लोक वृश्चिक, 3 कुंभ, 3 कर्क, 3 मकर, 3 मिथुन, 3 कन्या आणि 2. वृषभ आहेत. संशोधनात असेही समोर आले आहे की, जगातील 50 अब्जाधीशांच्या यादीत धनु राशीच्या एकाही व्यक्तीचा समावेश नाही.

या महिन्यात जन्मलेले लोक अब्जाधीश

संशोधनानुसार, जर आपण लोकांच्या जन्माचा महिना पाहिला तर, बहुतेक अब्जाधीशांचा जन्म ऑक्टोबरमध्ये झाला आहे. ऑक्टोबरमध्ये 11, ऑगस्टमध्ये 5, जूनमध्ये 5, जानेवारीमध्ये 3, फेब्रुवारीमध्ये 3, मार्चमध्ये 3, एप्रिलमध्ये 3 आणि सप्टेंबरमध्ये 3 अब्जाधीशांचा जन्म झाला आहे. जुलैमध्ये जन्मलेले 2 अब्जाधीश आणि नोव्हेंबरमध्ये 1 अब्जाधीश आहेत. डिसेंबरमध्ये एकही अब्जाधीश जन्माला आला नाही.

हे सुद्धा वाचा

ठिकाणानुसार अब्जाधीश होण्याची शक्यता

संशोधनानुसार, अमेरिकेत जन्मलेले 19 लोक अब्जाधीश आहेत. यानंतर अब्जाधीशांच्या यादीत चीनमधील 11, फ्रान्समधील 5, जर्मनीतील 3, जपान आणि कॅनडातील 2 आणि भारत, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, इस्रायल, इटली, युक्रेन, स्पेन आणि येमेनमधील 1-1 लोकांचा समावेश आहे.

जन्माच्या वर्षानुसार हे लोक अब्जाधीश

या संशोधनानुसार, 50 अब्जाधीशांच्या यादीत सर्वाधिक म्हणजे 4 जणांचा जन्म 1957 मध्ये झाला होता. याशिवाय 1948, 1949, 1951, 1962, 1964 आणि 1971 मध्ये जन्मलेल्या 3-3 लोकांचा अब्जाधीशांच्या यादीत समावेश आहे. याशिवाय 1930, 1938, 1940, 1953, 1954, 1955, 1956, 1980, 1983 आणि 1984 मध्ये जन्मलेल्या 1-1 लोकांचा अब्जाधीशांच्या यादीत समावेश आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.