24 तासानंतर शनिदेवांना मिळणार स्वत:च तेज, या तीन राशींवर पडणार सकारात्मक प्रभाव
ग्रहमंडळात शनिदेवांना न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे. शनि महाराज एकदा का राशीला आले की भल्याभल्यांना सरळ करून सोडतात. त्यामुळे राशीत आले की धाकधूक वाढते. शनिदेवांनी अडीच वर्षानंतर मीन राशीत प्रवेश केला आहे. असं असताना त्यांना स्वत:चं तेज मिळणार आहे. त्यामुळे राशीचक्रातील 3 राशींना लाभ मिळणार आहे.

ज्योतिषशास्त्रात, शनिदेवांच्या स्थितीवर फार लक्ष लागून असतं. कारण शनिदेव कशी फळं देणार याची पूर्णपणे जाणीव असते. नुकतंच म्हणजेच 29 मार्चला शनिदेवांनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे साडेसाती आणि अडीचकीची सर्वच गणितं बदलली आहेत. मीन राशीत आधीच सूर्यदेव असल्याने ही युती त्रासदायक ठरणारी आहे. कारण पितापुत्रांचं कधीच एकमेकांशी पटलं नाही. त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम होणार यात काही शंका नाही. शनि देव आणि सूर्यदेव एकत्र असल्याने शनिचा प्रभाव कमी झाला होता. सूर्याच्या तेजापुढे शनिचं तेज झाकोळलं गेलं आहे. मात्र पुढच्या 24 तासात म्हणजेच सूर्यदेव मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करण्यासाठी हालचाल करतील. यामुळे अंतर वाढल्याने शनिदेव 4 एप्रिलला मीन राशीत उदीत होतील. तर 14 एप्रिलला सूर्यदेव पूर्णपणे मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतील. यामुळे तीन राशीच्या जातकांचं भाग्य उजळणार आहे. चला जाणून घेऊयात याबाबत
मकर : या राशीची साडेसाती नुकतीच संपली असून तिसऱ्या स्थानात शनिदेव गोचर करत आहेत. यामुळे या काळात साहस आणि पराक्रमात वाढ झालेली दिसून येईल. योग्य ते निर्णय घ्याल. नोकरीत प्रमोशन मिळेल, तसेच नव्या जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक ठिकाणीही तुम्हाला मानसन्मान मिळेल. अचानकपणे धनलाभ होऊ शकतो.
मिथुन : शनिदेव या राशीच्या करिअर स्थानात उदीत होणार आहेत. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना या कालावधीत लाभ मिळणार आहे. विदेश यात्रेचा योग जुळून येईल. अध्यात्मिक प्रगती या कालावधीत होईल. तसेच नवा व्यवसाय सुरु करण्याची योजना यशस्वी होईल. कौटुंबिक पातळीवरील काही समस्या दूर होतील.
धनु : तसं पाहिलं तर या राशीला शनिची अडीचकी सुरु झाली आहे. शनि चौथ्या स्थानात असल्याने पनौती लागली असं म्हणतात. पण काही ठिकाणी तुम्हाला याचा लाभ मिळेल. खासकरून प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग जुळून येईल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळू शकतो. आई आणि सासरच्या लोकांसोबत संबंध आणखी दृढ होतील.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)