Shrawan 2023 : सूर्यापासून ते शनिपर्यंत ग्रह शांतीसाठी श्रावण महिन्यात करा विशेष उपाय
18 जुलैपासून श्रावण महिन्याला (Shrawan Month) सुरूवात होत आहे. श्रावणामध्ये थोडेसे प्रयत्न केल्यास कोणत्याही ग्रहाची समस्या सहज दूर होऊ शकते.
मुंबई : हिंदू धरमात भगवान शिव यांना विश्वाचे नियंत्रक मानल्या जाते. त्याच्या उपासनेने सर्व काही नियंत्रित केले जाऊ शकते. कोणतेही ग्रह नक्षत्र देखील सहजपणे शांत केले जाऊ शकते. 18 जुलैपासून श्रावण महिन्याला (Shrawan Month) सुरूवात होत आहे. श्रावणामध्ये थोडेसे प्रयत्न केल्यास कोणत्याही ग्रहाची समस्या सहज दूर होऊ शकते. जर तुम्हीही कोणत्याही ग्रहदोषामुळे त्रस्त असाल तर श्रावणात भगवान शंकराची आराधना आणि काही प्रभावी उपाय केल्यास लाभ मिळू शकतो.
ग्रहदोष दूर करण्यासाठी हे उपाय अवश्य करा
सूर्य देव
पाण्यात गूळ मिसळून श्रावणाच्या कोणत्याही रविवारी शिवलिंगावर अर्पण करा. शिवलिंगावर पांढरे जास्वंदाचे फूल अर्पण करा. “ओम आदित्यय नमः” चा जप करा
चंद्र
श्रावणात कोणत्याही दिवशी शिवलिंगावर पंचामृत अर्पण करा. यानंतर पांढरी फुलेही अर्पण करा. यानंतर “ओम सोम सोमया नमः” चा जप करा.
मंगळ
श्रावणातील कोणत्याही मंगळवारी शिवलिंगावर मध आणि जल अर्पण करा. लाल फुलेही अर्पण करा. “ओम अंगारकाय नमः” चा जप करा आणि कापूराने महादेवाची आरती करा.
बुध
श्रावणातील कोणत्याही बुधवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा. सुगंधित पाण्याने जलाभिषेक करा. यानंतर “ओम बम बुधाय नमः” चा जप करा.
बृहस्पति
श्रावणातील कोणत्याही गुरुवारी शिवलिंगावर जल अर्पण करा. वेदीवर हळद लावावी. “ओम बृहस्पतये नमः” चा जप करा आणि पिवळी मिठाई देखील अर्पण करा.
शुक्र
श्रावणातील कोणत्याही शुक्रवारी हा उपाय करा. शिवलिंगावर थोडे दूध आणि जल अर्पण करा. पांढरी सुगंधी फुले अर्पण करा आणि “ओम शुन शुक्राय नमः” चा जप करा.
शनि
श्रावणातील कोणत्याही शनिवारी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करा. यासोबतच निळी फुले अर्पण करावीत. “ओम शं शनैश्चराय नमः” चा जप करा. भगवान शंकराच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा.
राहू-केतू
श्रावणातील कोणत्याही बुधवारी करा. शिवलिंगावर जलाभिषेक करा. तसेच महादेवाला भांग धतुरा अर्पण करा. “ओम रा रहावे नमः” आणि “ओम के केतवे नमः” चा जप करा. शंकराच्या मंदिरात ध्वज अर्पण करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)