सूर्य देव मीन राशीत युवा अवस्थेत आल्याने चार राशींना मिळणार बळ, कसं असतं तेज जाणून घ्या
सूर्यदेवांना ग्रहमंडळात राजाचा दर्जा देण्यात आला आहे. सूर्यदेव एका राशीत महिनाभर ठाण मांडून बसतात. मात्र असं असताना ते कोणत्या स्थितीत विराजमान आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.
मुंबई : ज्योतिषशास्त्र बऱ्याच सिद्धांतांवर आधारित आहे. त्यामुळे कोणता ग्रह कसं फळ देणार हे त्या त्या वेळेवर आधारित असतं. ग्रहांचा गोचर, राशीतील भ्रमण, इतर ग्रहांशी युती, अस्त-उदय यासोबत ग्रह कोणत्या अवस्थेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. ज्या प्रकारे माणसाठी बाळ, कुमार, युवा आणि वृद्ध अवस्था असते. ग्रहांची अवस्था जातकाच्या जीवनात प्रभाव टाकत असतात. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह 30 डिग्री अंश मानला गेला आहे. ग्रह सम आणि विषम राशीत स्थित आहे का? यावरून त्याची अवस्था ठरवली जाते.
सूर्यदेव सध्या मीन राशीत गोचर करत आहेत. या स्थितीत सूर्यदेव 12 डिग्री अंशाच्या पुढे निघून गेला आहे. त्यामुळे सूर्याला युवा अवस्था प्राप्त झाली आहे. या अवस्थेत सूर्यदेव वेगाने फळं देतात. कुमार अवस्थेतून सूर्यदेव युवा अवस्थेत आले आहेत. त्यामुळे चार राशींना फायदा होणार आहे.
राशीचक्रात 1, 3, 5, 7, 9 आणि 11 अर्थात मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ विषम राशी आहेत. 2, 4, 6, 8, 10 आणि 12 अर्थात वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर आणि मीन या सम राशी आहेत.
ग्रह विषम राशीत असेल तर..
- 0-6 अंशापर्यंत बाल्यावस्था
- 6-12 अंशापर्यंत कुमार अवस्था
- 12-18 अंशापर्यंत युवा अवस्था
- 18-24 अंशापर्यंत वृद्ध अवस्था
- 24-30 अंशापर्यंत मृतावस्था
ग्रह विषम राशीत असेल तर..
- 0-6 अंशापर्यंत मृतावस्था
- 6-12 अंशापर्यंत वृद्ध अवस्था
- 12-18 अंशापर्यंत युवा अवस्था
- 18-24 अंशापर्यंत कुमार अवस्था
- 24-30 अंशापर्यंत बाल्यावस्था
या चार राशींना होणार फायदा
वृषभ – सूर्यदेव युवा अवस्थेत गोचर करत असल्याने या राशीच्या जातकांना फायदा होईल. सूर्य आणि गुरु ग्रह उत्नन्नाच्या स्थानात आहेत. त्यामुळे आर्थिक गणित बऱ्यापैकी सुटेल. विदेशवारीचा योग जुळून येऊ शकतो. आपल्याला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना चांगली पगारवाढ मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.
मिथुन – या राशीच्या जातकांना एकंदरीत ग्रहमान अनुकूल आहे. त्यात सूर्याची कृपा होणार आहे.सूर्यदेव कर्मभावात गोचर करणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. व्यवसायात वृद्धी दिसून येईल. मोठे करार या काळात चालून येतील. वडिलांकडून चांगलं सहकार्य मिळेल.
वृश्चिक – या राशीसाठी सूर्य गोचर सुखदायक ठरेल.सूर्यदेव बुद्धी आणि संतान स्थानात विराजमान आहेत. त्यामुळे या काळात गोड बातमी मिळू शकते. शेअर बाजार, लॉटरी यातून अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते.
कर्क – या राशीच्या जातकांच्या गोचर कुंडलीत सूर्यदेव नवव्या स्थानात गोचर करत आहेत. म्हणजेच सूर्यदेव भाग्य स्थानात विराजमान आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. कामानिमित्त विदेश दौरा होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)