Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 22 मार्च 2023, या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल
आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आजचे बारा राशींचे भविष्य
मेष
कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. कर्ज घेणे आज टाळा. गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहिल. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. काळजी घ्या.
वृषभ
विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. लेखन कला कायदा क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. महत्त्वाची कागदपत्रे मात्र संभाळा.
मिथुन
मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. हितशत्रुकडून फसवणुकीची शक्यता आहे. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक शांती राखण्याचा प्रयत्न करा.
कर्क
बोलण्यातील संभ्रम दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहिल.स्वतःच्या मनाने विचाराअंतीच निर्णय घ्या. यश नक्की मिळेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल. योजनेतून लाभ होतील. व्यापार नविन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. गृहसौख्य पत्नीकडून सहकार्य लागेल. संततीची विद्याभ्यासात रुची वाढेल. दिनमान शुभ आहे.
सिंह
नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. आजचा दिवस आनंदी जाईल. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहिल. खर्च मात्र विचार करून करा.
कन्या
नोकरीत कामाच्या ठिकाणी स्वःताला सिद्ध कराल. आपली प्रशंसा कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्यान प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य मिळाल्याने उत्साह वाढणार आहे.
तुला
बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. भावंडाच्या शुभवार्ता कळतील. नोकरीत प्रतिष्ठित, प्रसिद्ध व्यक्तीशी संबंध वाढतील. आज व्यापार वाढीच्या दृष्टीने उत्तम दिनमान आहे. व्यापारामध्ये विस्तार होईल. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका. दुसऱ्याचा कामात मात्र हस्तक्षेप करू नका.
वृश्चिक
नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न सफल होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. बांधकाम रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. कौटुंबिक प्रसन्नता राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे.
धनु
अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणेदेणे शक्यतो टाळावे. आर्थिक हानी होण्याची संभवना आहे. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आरोग्य बाबतीत विशेष काळजी घ्यावी. पित्त प्रकृती असलेल्यांनी सावधानी बाळगा.
मकर
कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद, मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. कला, साहित्य, क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. धनसंचय वाढेल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. आरोग्य उत्तम राहिल. प्रगतीकारक दिनमान आहे.
कुंभ
सामाजिक मान सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा व्यवहार होण्याची शक्यता आहे. आपल्याकडून वाद निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. कुटुंबात सहकार्याचे वातावरण राहिल. हितशत्रुवर मात कराल.
मीन
कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. व्यवहार कुशलतेमुळे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तूतीस पात्र ठराल. साधुसंत व्यक्तींचा सहवास लागेल. परमेश्वरवर विश्वास दृढ होईल. धार्मिक, शिक्षण क्षेत्रात कर्तुत्वाची संधी मिळेल. आरोग्य प्रकृती स्थिर व उत्साहपूर्ण राहणार आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)