Vastu Tips : तिजोरीत या पाच वस्तू ठेवल्याने आर्थिक मार्ग होतील मोकळे, देवी लक्ष्मीची होईल कृपा

वास्तुशास्त्रात दिशांना खूप महत्त्व आहे. दिशांचं महत्त्व आणि वस्तू ठेवण्याची पद्धत अधोरेखित करण्यात आली आहे. यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते. त्याचबरोबर आर्थिक मार्ग खुले होतात.

Vastu Tips : तिजोरीत या पाच वस्तू ठेवल्याने आर्थिक मार्ग होतील मोकळे, देवी लक्ष्मीची होईल कृपा
तिजोरीत या पाच वस्तू ठेवल्याने मिळतो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद, काय सांगतं वास्तुशास्त्र जाणून घ्या
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 5:38 PM

मुंबई : वैयक्तिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे राहत्या वास्तुचं शास्त्र आहे. कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवल्याने लाभ मिळतो, याबाबत यात सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रात दिशांना खूप महत्त्व आहे. दिशांचं महत्त्व आणि वस्तू ठेवण्याची पद्धत अधोरेखित करण्यात आली आहे. यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते. त्याचबरोबर आर्थिक मार्ग खुले होतात. त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हिंदू धर्मानुसार देवी लक्ष्मी धनदेवता आहे. देवी लक्ष्मीची नियमित पूजा केल्याने घरात आर्थिक अडचण येत नाही. तसेच जीवनात पैशांची कमी राहात नाही. वास्तुशास्त्रात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. यामुळे तिजोरीत पैसा खेळता राहतो. घरातील तिजोरीत आपण सोन्याचे दागिने, पैसा आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवतो. चला जाणून घेऊयात काय सांगतं वास्तुशास्त्र

  • उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा मानली जाते. त्यामुळे घरातील तिजोरी दक्षिण दिशेला टेकून ठेवायला हवी. या तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेकडे खुलणारा असायला हवा. यामुळे भगवान कुबेर आणि लक्ष्मीची कृपा दृष्टी राहते.
  • वास्तुशास्त्रानुसार तिजोरीत कायम धन आणि सुखाशी निगडीत देवींचे यंत्र ठेवले पाहीजेत. या धनवृद्धी यंत्रांची विधीवत पूजा करुन आपल्या तिजोरीत ठेवलं पाहीजे. घरातील तिजोरी कधीही रिती राहणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे.
  • तिजोरीत पैशांव्यतिरिक्त देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू ठेवल्या पाहीजेत. यामुळे देवी लक्ष्मीचा घरात वास राहतो. तिजोरीत पूजेची सुपारी, श्रीयंत्र आणि लक्ष्मी यंत्र ठेवलं पाहीजे.
  • हिंदू धर्मात हळदीचं महत्त्व सर्वाधिक आहे. त्यामुळे शुभ कार्यात हळदीचा वापर होतो. देवी लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी तिजोरीत हळदीच गाठ एका पिवळ्या किंवा लाल कपड्यात बांधून ठेवावी. यासोबक काही कवड्या आणि तांदळाचे अख्खे दाणेही ठेवावेत.
  • तिजोरीत देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी सुगंधित वस्तू ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये अत्तर, चंदनाच्या लाकडाचा तुकडा किंवा पुजेत वापर झालेल्या सुगंधित वस्तू ठेवा. सणासुदीच्या काळात देवाची पूजा करताना तिजोरीची पूजा करणं गरजेचं आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.