Weekly Horoscope : साप्ताहिक राशी भविष्य 26 फेब्रुवारी ते 4 मार्च, या राशीच्या लोकांच्या नोकरीत अचानक बदल घडतील
साप्ताहिक राशी भविष्य, जाणून घ्या हा आठवडा तुमच्या राशीसाठी कसा जाणार. या राशीच्या लोकांना व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक (Weekly Horoscope Marathi), मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य
मेष
आपण आपल्या कार्यक्षेत्रात परिस्थितीला सामोरे जाताना काही मर्यादा आखून घेणे गरजेचे आहे. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. कर्तृत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे. व्यवसायातून अपेक्षित फायदा होणार आहे. स्थावराशी संबंधित अथवा सरकारी कामे कालावधीत मार्गी लागतील. खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. संशोधकांनी काळात घेतलेली मेहनत पुढील काळ फलदायी ठरेल. खेळाडूंना अपेक्षित संपादन करता येईल. सप्ताहाच्या मध्यान्न काळानंतर वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्रासदायक काळात वादविवाद टाळा. नोकरीत अचानक बदल घडतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळल्याशिवाय अपेक्षित प्रगती करता येणार नाही. भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. आरोग्य ठीक राहणार नाही. कायम चिंताग्रस्त राहाल. राहत्या घरात चोरी व आग ह्याची भिती राहील. घरात कलह होतील. स्थावर इस्टेटीचे व्यवहारात आर्थिक नुकसान संभवते. हितशत्रु गुप्तशत्रुपासुन सावध रहा. मनातील इच्छित कामे, गुपिते कोणालाही सांगु नका.
वृषभ
ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत. नफ्यात वाढ होईल. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. आर्थिक उत्कर्षाचा कालावधी राहील. विवाहितांना जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला मार्गदर्शक व्यावहारिक दृष्ट्या उपयोगी ठरणार आहे. प्रेमिकांना अपेक्षित प्रतिसादासाठी प्रिय व्यक्तीचे मन वळवावे लागेल. संततीने घेतलेल्या मेहनतीचे चीज झालेले दिसेल. मुलांचे त्यांच्या क्षेत्रात कौतुक होईल. संततीला परदेश प्रवासाच्या संधी येतील. सप्ताहाच्या मध्यान्न काळानंतर काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. कामात उद्दिष्टपूर्तीचा आनंद मिळणार नाही. वरिष्ठांशी वादविवाद टाळा. स्पष्ट बोलण्यावर नियंत्रण ठेवणे तसेच गरजेपेक्षा जास्त न बोलणेंच उत्तम राहील. नोकरीत जबाबदाऱ्या वाढणार आहेत.विवाहितांनी जोडीदाराबरोबर बोलताना वागताना टोकाची भूमिका घेणे टाळायला हवे. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता मात्र निर्माण होऊ शकते. संततीचे आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. जुन्या व्याधी आजारपण अचानक उदभवेल. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्च वाढेल.आपले आरोग्य नरम गरम राहील.
मिथुन
आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करण्यासाठी ग्रहांची अनुकूलता आहे. नोकरीतील वातावरण चांगले राहील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. बरोबरचे सहकारी कामात उत्तम साथ देतील. व्यावसायिकांना प्रगतीचा काळ आहे. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यापारात व्यवसायवृद्धी साठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. प्रेमात पुढे जाताना, धाडसी निर्णय घेताना घरातील व्यक्तीला विश्वासात घ्या. लेखक व कलाकारांकडून उत्तम कलानिर्मिती होईल. प्रसिद्धीचे योग आहेत. घर, वाहन खरेदीस योग्य कालावधी आहे. घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. घरातील ज्येष्ठ मंडळीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या प्रकृतीत अनेक चढ उतार येण्याची संभावना आहे.
कर्क
ठरलेल्या योजना मार्गी लागतील. धडाडीने निर्णय घेतल्यास महत्वकांक्षा ठेवून परिश्रम केल्यास कार्यक्षेत्राची क्षितीजे विस्तृत झाल्याचे दिसून येईल. नवीन योजना नवीन कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. योजना आखाव्या लागतील आणि त्या सहकाऱ्यांकडून पूर्ण करून घ्याव्यात. बरोबरचे सहकारी वरिष्ठ या दोघांची उत्तम साथ मिळेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल आणि आर्थिक लाभही वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. कमिशनचे अथवा ट्रेडिंगचे व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळणार आहे. व्यवसायातील फायदा वाढेल. व्यवसायानिमत्त प्रवासाचे योग येतील. नोकरी-व्यवसायातील लाभ, तसेच दीर्घ मुदतीची गुंतवणूक अथवा जमीन स्थावराच्या व्यवहारातून उत्तम आर्थिक फायदा होईल. वैवाहिक जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल.लेखकवर्गाकडून दर्जेदार लिखाण होईल व त्याचे कौतुकही होईल. नोकरीत उद्दिष्ट पूर्ण करता येईल. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचे कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. परंतु बोलण्यावर संयम ठेवा. स्पष्ट बोलणे टाळावे लागेल. एकंदरीत शुभ सप्ताह आहे.
सिंह
हा सप्ताह आर्थिक प्रगती राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य लागेल. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाला उत्तम दाद मिळेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ लाभेल. सोबतच आपण केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान देखील लाभणार आहे. वाहन सौख्य मिळेल. कौटुंबिक जिवन अनुकुल राहील. जोडीदाराची साथ लाभेल. व्यवसियाकांनी व्यवसायात केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. येतील. आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासातील प्रगती त्यामध्ये आपण यशस्वी व्हाल. कला लेखकवर्गास लिखाणाच्या माध्यमा तून उत्तम प्रसिद्धि योग आहेत. विरोधकावर मात करण्यास काळ उत्तम आहे. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात आनंदी वार्ता मिळेल. मानसिक अवस्था उत्तम राहील. आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल. कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका अन्यथा स्वताचे नुकसान करून घ्याल. अतिउत्साही व अविचारी घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात. आर्थिक आघाडीवर सप्ताह उत्तम राहणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे.
कन्या
सप्ताहाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्थ्यासोबत तणाव वाढवू शकते. व्यय, लग्न आणि धनातील चंद्रभ्रमणात परिस्थिती संयम ठेवून हाताळा अन्यथा प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. नोकरीत स्थान बदल घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गास प्रतिकुल काळ असणार आहे. काळजीपूर्वक व्यवहार करावेत. गुप्तशत्रु विरोधकांचा त्रास जाणवेल. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास अस्वस्थता जोडीदाराशी वादविवाद असे प्रसंग घडतील. कुटुंबात वडिलोपार्जित संपत्तीमध्ये नविन समस्या उद्भवतील. सप्ताहाच्या मध्यान्न काळानंतर ठरवलेल्या योजनांना गती मिळणार आहे. कामाचा व्याप वाढणार आहे आणि व्याप सांभाळण्याची तुमची क्षमताही वाढणार आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. आखलेले योजना काही कालावधीत वेगाने मार्गी लागतील. कामानिमित्त लांब पल्ल्याचे प्रवासही होणार आहेत. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. परंतु बोलण्यावर संयम ठेवा. स्पर्धकांवर मात कराल. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र मेहनत वाढवावी लागेल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतीत. आहारावर आणि व्यसनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
तुळ
सप्ताहात मध्यम स्वरूपाची फल मिळतील.आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. नोकरी-व्यापारात काही नवीन भागीदारासोबत संबंध प्रस्थापित होतील. आपल्या कार्यक्षेत्रात काही चांगली फळे देतील. पण आपण वरिष्ठांशी हितसंबंध जोपसताना सावध असायालाच पाहिजे. सुखात कायम काही ना काही लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. पूर्ण सतर्क रहा. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे. आपल्या कार्यक्षेत्रात नव्या कल्पना व युक्त्या यानी थोडेफार हुरूळुन जाल. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. मध्यान्न काळानंतरआरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. नव्या कल्पना इतरांना पटतील. सामाजिक क्षेत्रात आपल्या कलागुणांना प्रसिद्धी लाभेल. सन्मानाचे सुद्धा योग आहेत. जोडीदाराचा उत्कर्ष होईल. कौटुंबिक बाबतीत आनंदही उपभोगाल. नव्या संधी प्राप्त होतील. मनाप्रमाणे कामे करता येतील. अतिशय प्रिय असलेल्या ठिकाणी प्रवास होईल. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. महिला वर्गास शासनाकडून मान-सन्मान मिळेल.
वृश्चिक
बेरोजगारांना नोकरीचे योग आहेत. नोकरीत वरिष्ठांच्या सहकार्यातून बढती मिळेल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील सहकार्यामुळे मन समाधानी राहिल. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. कामात आपला प्रभाव राहील. नावलौकिकता वाढेल. तरुण तरुणीचे विवाहाचे योग आहेत. वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणीकडून लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. सप्ताहाच्या उत्तरार्थ मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासून जाल. खर्च वाढणार आहे. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. काळजी घ्या. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवास टाळा. जर शक्य नसेल तर योग्य ती काळजी घ्या. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा.
धनु
आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी प्राप्त होतील. मनावरचा ताण बऱ्यापैकी कमी झालेला असेल. आर्थिक व सामाजिक कार्यात प्रगती कराल. नवनवीन मार्गाने धनलाभ होईल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आपले मनोबल व आत्मविश्वासात कमालीची वाढ दिसेल. राजकीय सामाजीक क्षेत्रातील कामाचे कौतुक होईल. शासकिय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील अतिशय शुभप्रद घटना या सप्ताहात घडतील.वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहिल. मानसिक स्वास्थ लाभेल. आपण केलेल्या प्रयत्नास सफलतापूर्वक यश मिळेल.
मकर
स्वभावात रागीटपणा निर्माण होईल. कुटुंबापासून वेगळे राहण्याचे प्रसंग येतील. व्यापारात अपयश येण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या कामात अडथळे येतील. आहारावर नियंत्रण ठेवा. मध्यान्न काळानंतर समस्येपासून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. आर्थिक आघाडीवर प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या आर्थिक व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. आर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्या जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल.वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. आध्यात्मिक भावना निर्माण होईल. विद्यार्थ्यांना नवनविन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. महिला वर्गासाठी ग्रहमान अनुकुल आहे. कलाक्षेत्रात असणाऱ्या महिलांसाठी प्रगतीचे शिखर गाठण्यास काळ अती उत्तम आहे.परदेश प्रवास होईल.
कुंभ
शनिच्या साडेसतीचा प्रभाव पाहता मनस्तापासारख्या घटना घडतील. सावधगिरी बाळगुन वाटचाल करावी. घरातील वातावरण ताणतणात्मक राहिल, व्यवसायिकांचे उद्योगधंदयात लक्ष कमी होईल. महिला वर्गास प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. वाहन प्रवासात काळजी घेणे जरुरीचे आहे. घरातील मतभेद सामोपचाराने मिटविलेले बरे अन्यथा त्रासदायक ठरतील आर्थिक दृष्ट्या ओढाताणीचा कालावधी आहे. जमिनीचा व्यवहार जपून करावा लागणार आहे. पैसे मिळण्यास विलंब होईल किंवा व्यवहार अर्धवट होण्याची संभावना आहे. मानसिक स्थिती अस्थिर राहिल. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जोडिदारास समजून घेणे गरजेचे आहे. भागीदारीत व्यवसाय करण्यामुळे आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. हा काळ तारेवरची कसरतीचा आहे. तेव्हा निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. मध्यान्न काळानंतर नोकरदारासाठी ग्रहमान साथ देणार आहे. नोकरीत बढ़तीची बातमी मिळेल. भावडांशी संयमाने रहावे नाही तर त्यांच्या पासुन दुरावण्याची शक्यता आहे. सुशिक्षीत तरुणवर्गास नोकरी शोधण्यासाठी फार कष्ट सोसावे लागणार नाही. आपणास इच्छित नोकरी त्वरीत मिळेल.आपला मोठ्या समारंभात सहभाग असेन. घरातील वातावरण आनंदी असेल.
मीन
व्यवसायिकांनी भागीदारी न करणे योग्य आहे. व्यवसायात आपणाला अपेक्षित फायदा न झाल्यामुळे आपण चिंतीत असात. भागिदारी व व्यवसायातले व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कर्जामुळे आपणास त्रास जाणवेल. व्यवहारामध्ये दक्षता घेणे आवश्यक आहे. व्यापारात प्रतिस्पर्ध्यी वरचढ होतील. गुप्तशत्रुकडून त्रास जाणवेल. नोकरीत वरिष्ठांचे म्हणणे आपणास टाळता येणार नाही अन्यथा त्यांच्याशी वादविवाद होण्याची संभावना दाट आहे. नोकरीत बदल करण्यास काळ अनुकूल आहे. राजकिय व्यक्तींना बदनामी व कुप्रसिद्धीला सामोरे जावे लागेल. प्रेमी युगुलांसाठी काळ प्रतिकुल आहे. बोलताना वादविवाद टाळा. प्रेमी युगुलांनी प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपून घेणे गरजेचे आहे. फसवणूकीची संभावना आहे. सप्तमातील चंद्र गोचर पतीपत्नीतील मतभेद वाढविणारे आहे. अवास्तव खर्च टाळणे. अतिशय प्रिय असणारा व्यक्ती दुरावणार आहे. संततीस काळ प्रतिकुल आहे. शेअर्समधील गुंतवणूक लांबणीवर ठेवा. प्रवासात विशेष काळजी घ्या. मित्र मंडळी नातेवाईक यांच्याशी व्यवहारात दक्षता घ्यावी. आरोग्याबाबतीत विशेष तक्रारी आणि अपघात भय संभवते काळजीपूर्वक वाहन चालवा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)