घातपात आणि नैसर्गिक आपत्तीने घेरलंय 2023 वर्ष, कोणी वर्तवलं हे भाकीत ?

जैविक शस्त्रांचा ( अणु ) हल्ला, लॅबमध्ये मुलांचा जन्म, पृथ्वीच्या कक्षेत बदल, ग्रहांवरून येणाऱ्या शक्तींद्वारे ( एलियन्स ) पृथ्वीवर हल्ला, सौरवादळ ( त्सुनामी ) यासोबतच आशिया खंडातील कोणत्याही अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट होऊन लाखो लोकांचा मृत्यू...

घातपात आणि नैसर्गिक आपत्तीने घेरलंय 2023 वर्ष, कोणी वर्तवलं हे भाकीत ?
BABA VENGAImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 12:41 PM

मुंबई : बल्गेरियन भविष्यवेक्ता बाबा वेंगा या ‘नास्त्रेदमस वुमन’ म्हणून प्रसिद्ध आहेत. बल्गेरियाच्या रहिवासी असलेल्या बाबा वेंगा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी झाला. त्यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा. त्या जन्मापासून आंधळ्या होत्या. कोझुह पर्वताच्या रुपीट प्रदेशात त्या आपले जीवन व्यतीत करत होत्या. देवाने त्यांना दृष्टी दिली नसली तरी भविष्यात काय घडणार आहे, काय नाही हे सांगणारी दिव्य दृष्टी दिली होती. आपल्या दिव्य दृष्टीने त्या सर्व काही अनुभवू शकत होत्या. त्यांनी सांगितलेले भविष्य तंतोतत जुळत होते. त्यामुळे त्यांना बाबा वेंगा असे नाव मिळाले आणि त्याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या.

१९९६ साली बाबा वेंगा यांचे निधन झाले. मात्र, त्याआधी २६ वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मृत्यूचे भाकीत वर्तविले होते जे खरे ठरले. त्यांची भविष्यवाणी कुठेही लिहिलेली नाही परंतु त्यांनी सांगितलेली भाकिते ही त्यांच्या अनुयायांकडून सांगितली जातात.

हे सुद्धा वाचा

बाबा वेंगा यांनी अनेक भाकित वर्तविली आहेत. सन 5079 मध्ये पृथ्वीचा नाश होईल असे भविष्य त्यांनी सांगितले आहे. 9/11 चा दहशतवादी हल्ला, आफ्रिका-अमेरिकन वंशाचे व्यक्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील तसेच कोरोना साथीच्या आजाराबद्दलची त्यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे.

बाबा वेंगा यांच्या या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्यामुळे आता अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी 2023 या वर्षासाठी केलेली भविष्यवाणी. 2023 मध्ये पाच महत्वाच्या घटना घडणार आहेत असे भविष्य त्यांनी वर्तविले आहे.

2023 हे वर्ष अनपेक्षित घटना आणि शोकांतिकेने भरलेले

जैविक शस्त्रांचा ( अणु ) हल्ला, लॅबमध्ये मुलांचा जन्म, पृथ्वीच्या कक्षेत बदल, ग्रहांवरून येणाऱ्या शक्तींद्वारे ( एलियन्स ) पृथ्वीवर हल्ला, सौरवादळ ( त्सुनामी ) यासोबतच आशिया खंडातील कोणत्याही अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट होऊन लाखो लोकांचा मृत्यू अशा पाच संकटाचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, 2023 हे वर्ष अनपेक्षित घटना आणि शोकांतिकेने भरलेले असेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

मानवाचा जन्म प्रयोगशाळेत

2023 मध्ये रशिया – युक्रेन वाद खूपच चिघळला आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास अणुबॉम्ब वापरण्याचा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिला आहे. जर हा हल्ला झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम सर्वच देशांना भोगावे लागणार आहेत. मानवाचा जन्म प्रयोगशाळेत होऊन यात लोकांचे चारित्र्य, त्वचेचा रंग ठरवला जाईल.

2023 वर्ष हे केवळ एका देशासाठी नव्हे तर पृथ्वीसाठीही महत्त्वाचे ठरणार आहे. पृथ्वी आणि अन्य ग्रहांच्या हालचाली वेगाने होऊन त्याचा मानवी आयुष्यावर मोठा परिणाम होईल. पृथ्वीची कक्षा बदलून नैसर्गिक आपत्तीची शक्यताही बाबा वेंगा यांनी व्यक्त केली आहे.

अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट होऊन जगात विषारी ढग पसरू शकतात. ज्याचा सर्वाधिक परिणाम आशिया खंडावर होऊन गडद अंधार पसरेल. या विषारी ढगांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.