AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: दैनिक राशी भविष्य- या राशीच्या लोकांनी प्रलोभनांपासून दूर राहावे, जोडीदाराचे वागणे संशयास्पद वाटू शकते

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

Astrology: दैनिक राशी भविष्य- या राशीच्या लोकांनी प्रलोभनांपासून दूर राहावे, जोडीदाराचे वागणे संशयास्पद वाटू शकते
राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 04, 2022 | 7:26 AM
Share

Astrology:  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष –  व्यापाऱ्यांनी कोणताही नवीन प्रकल्प घाईगडबडीत सुरू करू नये, आधी त्याच्या सर्व बाबींचा बारकाईने विचार करा. पति-पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात. हंगामी आजार होण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्यावी.
  2. वृषभ – या राशीच्या लोकांनी त्यांच्या बोलण्याचे मूल्य समजून घेतले पाहिजे.  घरासाठी केलेली जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. पाठदुखीची शक्यता आहे. विश्रांती घेणे फायदेशीर ठरेल.
  3.  मिथुन – मिथुन राशीच्या लोकांना कार्यालयीन कामानिमित्त्य  इतर शहरात जावे लागू शकते, यासाठी त्यांनी तयारी ठेवावी. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यापारी आज चांगला नफा कमवू शकतील.  तरुणांनी नवीन नातेसंबंधांमध्ये योग्य अंतर राखले पाहिजे, जास्त वेगाने जवळ येणे चांगले नाही.
  4.  कर्क – कामांचा आळस करणे महागात पडेल. पित्ताचा त्रास संभवतो. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आर्थिक व्यवहारात डोळसपणे विश्वास ठेवा. फसवणूक होण्याची शक्यता आहे. प्रलोभनांना बळी पडू नये.
  5. सिंह – कार्यालयीन कामाचे कौतुक होईल. व्यापार्‍यांना परदेशी कंपन्यांकडून चांगल्या ऑफर मिळू शकतात. तत्वाने वागा. क्षणिक नफ्यासाठी तत्वांशी तडजोड करू नका. भावंडांसोबत दिवस आनंदात जाईल.
  6. कन्या – या राशीच्या लोकांवर कार्यालयात कामाचा अतिरेक झाल्यामुळे दबाव वाढेल. आज व्यवसाय सामान्य राहील. पोटाशी संबंधित आजार जसे की बद्धकोष्ठता, गॅसची समस्या जाणवेल. वडिलोपार्जित व्यावसायिक लोकांशी संबंध आणि संपर्क मजबूत करून नफा कमवू शकतील.
  7. तूळ – बोलण्यावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. जोडीदारासोबतचे मतभेद संपुष्टात येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
  8. वृश्चिक- मानसिक ताण हलका होईल. धार्मिक कामात मन रमेल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होणार नाही याची काळजी घ्यावी. नवीन ओळखीतून उत्पन्नाचे मार्ग खुलतील. दिवस आनंदात जाईल.
  9. धनु- आजचा दिवस धावपळीचा राहील. जबाबदारीने कामं करावी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रलोभनांपासून दूर राहा. समाधानी वृत्ती ठेवल्याने भविष्यातील हानी टळेल.
  10. मकर- मानसिक ताण जाणवू शकतो. धार्मिक कार्यानिमित्त्य प्रवास संभवतो. मनाविरुद्ध निर्णय घेऊ नका. सामाजिक कार्यक्रमात मान मिळेल. पैशांचा अपव्यय टाळा.
  11.  कुंभ- मोठे निर्णय पुढे ढकलावे. आत्मविश्‍वासात ठेवा आणि स्वतःमध्ये नेतृत्व विकसित करा. जोडीदाराचे वागणे संशयास्पद वाटू शकते. कुटुंबातला कलह थांबविण्यासाठी पुढाकार घ्या.
  12.  मीन- सहलीला जाण्याचा बेत आखाल. इतरांचे मन जपण्यासाठी मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक सुबत्ता लाभेल. व्यसनांपासून दूर राहा. वाताचा त्रास संभवतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.