Special Story | पवित्र गुरुद्वारा, माहूर गड अन् जाज्वल्य इतिहास, नांदेडला नांदेडच का म्हणतात माहिती आहे का ?

Nanded History : या जिल्ह्याचा इतिहास त्याची जडणघडण हे सगळं काही मोठं रंजक आहे. याच जिल्ह्याविषयी आपण या स्पेशल स्टेरीत जाणून घेऊयात.

Special Story | पवित्र गुरुद्वारा, माहूर गड अन् जाज्वल्य इतिहास, नांदेडला नांदेडच का म्हणतात माहिती आहे का ?
नांदेड जिल्हा
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 7:59 AM

नांदेड : नांदेड जिल्हा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एका क्षणात गुरुद्वारा येतो. गुरुद्वाराची भव्यता, तेथील पवित्र वातावरण आपल्या मनात घर करु लागतं. पण फक्त गुरुद्वारा हीच नांदेड जिल्ह्याची ओळख आहे का ? तर नाही. या शहरात पवित्र असे गुरुद्वारा तर आहेच. पण याच बरोबरच या जिल्ह्याचं वेगळं असं भरपूरकाही आहे. या जिल्ह्याचा इतिहास त्याची जडणघडण हे सगळं काही मोठं रंजक आहे. या सर्व गोष्टी आपण या स्पेशल स्टेरीत जाणून घेऊयात. (know all information of nanded district in marathi know about mahurgad malegaon yatra and gurudwara)

♦  नांदेडला नांदेडच का म्हटले जाते ?

नांदेड जिल्ह्याला नांदेडच नाव का पडलं ? या जिल्ह्याला दुसरं नाव का दिलं गेलं नाही ? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. नांदेड या नावामागे मोठा इतिहास आहे. नांदेडचा उगम हा नंदी-तट या शब्दापासून झाला आहे. नंदी म्हणजे शंकराचे वाहन आणि तट म्हणजे गोदावरी नदीचा काठ. नंदीने गोदावरीच्या तिरावर तपश्चर्या केल्याचे म्हटले जाते. तशी अख्यायिका आहे. याच कारणामुळे या जिल्ह्याला नांदेड असे नाव पडले. नांदेड जिल्ह्याला प्रामुख्याने हुजूर साहेब नांदेड या नावाने भारतभर ओळखले जाते. श्री गुरूगोविंदसिंह गुरूव्दारा या ठिकाणी असल्यामुळे येथे दर्शन घेण्यासाठी जगरभरातून भाविक येत असतात.

♦  नांदेड जिल्ह्याचा इतिहास

परभणी, हिंगोली, औरंगाबाद जिल्ह्याप्रमाणेच नांदेड या जिल्ह्यावरसुद्धा निजामांचे राज्य होते. नांदेड जिल्हा 1725 मध्ये हैदराबाद संस्थानाचा एक भाग झाला. 1947 साली संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, हैदराबाद संस्थानाने भारतात विलीन होण्यास नकार दिल्यामुळे नांदेड 1947 नंतरही भारतात सामील झालेले नव्हते. नंतर भारत सरकारने हैदराबाद संस्थानवर केलेल्या कारवाईनंतर नांदेड जिल्हा 17 सप्टेंबर 1948 रोजी भारताचा तसेच महाराष्ट्राचा भाग झाला. 1948 मध्ये नांदेड जिल्ह्याचा स्वतंत्र भारतात समावेश करण्यात आला.

♦  नांदेड जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा

सध्याच्या नांदेड जिल्ह्याबद्दल सांगायचे झाले तर या जिल्ह्यात एकून 16 तालुके आहेत. या जिल्ह्याला कर्नाटक आणि तेलंगाणा अशा एकूण दोन राज्यांच्या सीमा लागतात. नांदेड जिल्ह्याच्या माध्यमातून दोन राज्यांत प्रवेश करता येत असल्यामुळे या जिल्ह्याला मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे. नांदेड जिल्ह्याचे एकूण क्षेत्र 10528 चौ. कि.मी. आहे. तर एकूण लोकसंख्या 33,61,292 आहे. यामध्ये एकूण पुरुष 1730075 तर स्त्रिया 1631217 आहेत. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर 943 आहे. शहरी लोकसंख्या 913898 तर ग्रामीण लोकसंख्या 2447394 आहे. साक्षरतेचे प्रमाण 75.45 टक्के आहे. यामध्ये पुरुष साक्षरतेचे प्रमाण 84.27 टक्के तर स्त्री साक्षरतेचे प्रमाण 66.15 टक्के आहे.

♦  नांदेड जिल्ह्यातील तालुके खालीलप्रमाणे आहेत

♦ नांदेड

♦  भोकर

♦  बिलोली

♦ देगलूर

♦  धर्माबाद

♦  हदगाव

♦  हिमायतनगर

♦  कंधार

♦  किनवट

♦  लोहा

♦  माहुर

♦  मुदखेड

♦  मुखेड

♦  नायगाव

♦  उमरी

♦  जिल्ह्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळे 

♦  श्री गुरूगोविंदसिंह गुरूव्दारा – Shri Guru Gobind Singh Ji Museum- शिख धर्मियांच्या पाच सर्वात पवित्र स्थानांपैक हे एक स्थान आहे. संपूर्ण भारत देशातील शिख धर्मीय लोक येथे दर्शनसाठी येतात. श्री गुरु गोबिंदसिंह यांनी येथेच शेवटचा श्वास घेतला. याच कारणामुळे या ठिकाणाला मोठे महत्त्व आहे. या गुरुद्वाराची निर्मिती पंजाबचे शासक महाराज रणजितसिंहजींनी 1830 ते 1891 या काळात केली. या गुरुद्वारामध्ये दहाव्या गुरुंचे मर्त्य अवशेष आहेत.

♦  मालेगाव यात्रा- नांदेडमधील मालेगाव यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. भगवान खंडोबाच्या सन्मानार्थ लोहा तालुक्यातील मालेगावात दरवर्षी ही यात्रा भरते. दरवर्षी डिंसेबर, जानेवारी महिन्यात ही यात्रा आयोजित केली जाते. नांदेडपासू सूमारे 75 किमी अंतरावर मालेगाव हे ठिकाण आहे. ही यात्रा पशूंच्या बाजारपेठेसाठीसुद्धा ओळखली जाते.

♦  माहूर गड- हे एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. याला महाराष्ट्रातील शक्तीपीठ म्हटले जाते. येथे रेणुका देवीचे मंदीर असून ते नैसर्गिक डोंगरात वसलेले आहे. हे मंदिर सुमारे आठशे ते नऊेशे वर्षांपूर्वी बंधण्यात आले होते. येथे दसऱ्यानिमित्त दरवर्षी मोठा मेळावा भरतो. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची रेणुकामाता होय.

♦  जिल्ह्याची सर्व आघाड्यांवर विजयी घोडदौड

नांदेड जिल्ह्यामध्ये या गोष्टीशिवाय इतरही अनेक बाबी पाहण्यासारख्या आहेत. येथे शिक्षण व्यवस्थेचा मोठा विकास झालेला आहे. NEET, CET, IIT अशा विविध परीक्षांची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रतील विविध जिल्ह्यातून येथे विद्यार्थी येतात. तसेच येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ असून येथील शिक्षणाचा दर्जा उच्च आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अशा विविध आघाड्यांवर या जिल्ह्याची विजयी घौडदौड सुरु आहे.

इतर बातम्या :

Special Story | औरंगजेबाची राजधानी, ताजमहलची प्रतिकृती, वेरुळ-अजिंठा लेण्यांचं वैभव, जाणून घ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या माहीत नसलेल्या गोष्टी

special story | नेमगिरीपासून ते संतांच्या भूमीपर्यंत, परभणी जिल्ह्याच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.