Women’s Day Special Video: महिंद्राच्या या जाहिरातीची देशभर चर्चा, आसान होता तो हर कोई किसान होता!

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा कंपनीची जाहिरात देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे.( Mahindra Tractors Video on International Women Day)

Women's Day Special Video: महिंद्राच्या या जाहिरातीची देशभर चर्चा, आसान होता तो हर कोई किसान होता!
महिंद्रा ट्रॅक्टर्सची महिला दिनानिमित्त विशेष जाहिरात
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 1:55 PM

मुंबई: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील अग्रगण्य ट्रॅक्टर कंपनी महिंद्रा कंपनीची जाहिरात देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. महिंद्रा कंपनीच्या जाहिरातीद्वारे महिलांची कणखर प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महिला दिनाच्यानिमित्तानं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सोशल मीडियावर जाहिरातीचं विशेष कौतूक करण्यात येत आहे. जाहिरातीची थीम ‘आसान होता तो हर कोई किसान होता!’, अशी ठेवण्यात आली आहे. (Mahindra Tractors Special Video Ad on the occasion of International Women Day)

व्हिडीओत काय?

महिंद्रा ग्रुपच्यावतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडीओची मध्यवर्ती संकल्पना ही ट्रॅक्टरसाठीचं लायसन्स मिळवण्यासाठी लागणाऱ्या ड्रायव्हिंग टेस्ट अशी ठेवण्यात आली आहे. या व्हिडीओत शक्ती नावाची तरुणी आणि आरटीओ विभागाचा अधिकारी यांच्यातील संवाद दाखवण्यात आला आहे. आरटीओ अधिकारी तरुणीला ट्रॅक्टरची ड्रायव्हिंग टेस्ट देणं आसान नही होगा, असं म्हणतो त्यावर शक्ती नावाची तरुणी आसान होता तो हर कोई किसान होता!, असं म्हणते. महिंद्रा ग्रुपकडून याद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या प्रती असणारा दृष्टिकोन बदलणं आणि शेतकऱ्यांना देखील सलाम करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास

अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्री कामगारांनी 8 मार्च 1908 रुटगर्स चौकात प्रचंड मोठी निदर्शने केली. या निदर्शनांमध्ये कामाचे जादा तास, कमी पगार या विरोधात आणि मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी करण्यात आली. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लारा झेटकीन या महिला कार्यकर्तीनं ने मांडला, तो पास झाला.  भारतात मुंबईत 8 मार्च हा महिला दिवस 1943 मध्ये साजरा केला गेला.

संबंधित बातम्या: 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोन वर्षात किती पैसे मिळाले?

Mumbai | पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेचं आंदोलन

Geranium Farming| नांदेडच्या युवा शेतकऱ्यांनी करुन दाखवलं, जिरेनियम शेतीद्वारे लाखोंची कमाई

‘अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण’ ते ‘शिवसेनेची रणरागिणी’, कोण आहेत नीलम गोऱ्हे?; वाचा सविस्तर

(Mahindra Tractors Special Video Ad on the occasion of International Women Day)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.