Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story | 23 वर्षात पृथ्वीवरुन 280 खर्व टन बर्फ वितळला, ग्लोबल वॉर्मिंगबाबत अलर्ट करणारी माहिती

सॅटेलाईटच्या आकड्यांचा उपोयग करुन विशेषज्ज्ञांनी माहिती मिळवली की पृथ्वीने 1994 ते 2017 पर्यंत 280 खरब टन बर्फ गमावला आहे. (Earth Lost 28 trillion Tonnes Ice)

Special Story | 23 वर्षात पृथ्वीवरुन 280 खर्व टन बर्फ वितळला, ग्लोबल वॉर्मिंगबाबत अलर्ट करणारी माहिती
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 8:49 AM

मुंबई : जगातील बरेच संशोधक हवामान बदलांविषयी (Climate change) नवीन परंतु धक्कादायक माहिती देत ​​आहेत. ग्लोबल वॉर्मिंग (Global warming) आणि हवामान बदलांमुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची माहिती आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, गेल्या 23 वर्षांत अभूतपूर्व प्रमाणात बर्फ गमावला (Ice loss) आहे. ज्या दराने जगभरातून बर्फ गायब होत आहे, त्यावरुन युकेच्या शास्त्रज्ञांनी अंदाज लावले आहेत की ही परिस्थिती जगातील क्लायमेट वॉर्मिंगची (Climate Warming) सर्वात वाईट परिस्थिती आहे. (Study Says Earth Lost 28 trillion Tonnes Of Ice In Past 23 Years)

सॅटेलाइट आकड्यांच्या मदतीने माहिती मिळवली

एडिनबर्ग विद्यापीठ, लीड्स विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांच्या एका टीमनुसार, जगात ध्रुव आणि डोंगराळ भागात ज्या दराने बर्फ वितळत आहेत, त्या प्रमाणात मागील तीन दशकांत बरीच वाढ झाली आहे. सॅटेलाईटच्या आकड्यांचा उपोयग करुन विशेषज्ज्ञांनी माहिती मिळवली की पृथ्वीने 1994 ते 2017 पर्यंत 280 खरब टन बर्फ गमावला आहे.

बर्फ वितळण्याचा दर कधी बदलला

या अभ्यासानुसार, 1990 च्या दशकात बर्फ वितळण्याचा दर 8 खरब टन प्रति वर्ष ते वर्ष 2017 पर्यंत 13 अरब टन प्रति वर्षपर्यंत पोहोचली. ही परिस्थिती अत्यंत घातक मानली जात आहे. याचा सर्वात वाईट परिणाम जगभरातील किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांवर नक्कीच होईल.

या परिसरांवर गंभीर परिणाम होणार

लीड्सच्या सेंटर ऑफ पोलर ऑबझर्वेशन अँड मॉडलिंगचे रिसर्च फेलो डॉ. थॉमस स्लेटर यांच्यामते इंटर-गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) च्या निश्चित हवामान वॉर्मिंगच्या निकषांमध्ये सध्याची बर्फाच्या लेअर्सची परिस्थिती परिस्थिती सर्वाधिक वाईट आहे.

कुठल्या ठिकाणांचं संशोधन?

हे संशोधन युरोपिअन जियोसायन्सेस युनियनच्या द सायबर स्पेस जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. या संशोधनात संपूर्ण जगाच्या 215 हजार पर्वतांच्या ग्लेशिअर, ग्रीनलँड आणि अंटार्कटिकाच्या ध्रुवीय बर्फाची चादर, अंटार्कटिकाच्या जवळपास तरंगणारी बर्फाचे डोंगर आणि आर्कटिक तथा दक्षिणी महासागरांमध्ये मिळाणाऱ्या समुद्री बर्फाचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे.

समुद्रात पाणी कसं वाढतं?

या सर्वेक्षणनुसार, गेल्या तीन दशकांमध्ये सर्वाधिक बर्फ आर्कटिक सागर आणि अंटार्कटिकामध्ये गमावण्यात आलं आहे. दोन्ही ध्रुवीय महासागरांमध्ये बर्फ तरंगत असतो. त्यामुळे या प्रकरारच्या नुकसानीचा सरळ परिणाम हा समुद्राच्या पाणी पातळीवर होतो.

(Study Says Earth Lost 28 trillion Tonnes Of Ice In Past 23 Years)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.