तुळजाभवानी देवीच्या दागिने गहाळ प्रकरणी मोठी अपडेट, दोषींवर कडक कारवाई होणार

Tuljabhawani Temple latest News महाराष्ट्राची कुलदेवी तुळजाभवानी देवीच्या मंदिरातून  देवीच्या 27 अलंकारा पैकी 4 अलंकार गायब झाले तर 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्र देखील गायब करण्यात आले. सोन्याचा मुकुट, मंगळसुत्र, नेत्रजोड, माणिक मोती यांचा गहाळ झालेल्या दागिन्यांमध्ये समावेश आहे.

तुळजाभवानी देवीच्या दागिने गहाळ प्रकरणी मोठी अपडेट, दोषींवर कडक कारवाई होणार
तुळजाभवानी मंदिर Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 4:52 PM

धाराशिव : तुळजाभवानी मंदिरातून (Tuljabhawani Temple Fraud) देवीचे सोन्याचे मुकूट आणि चार मौल्यवान सोन्याचे ऐतिहासीक दागिने गहाळ झाल्याची धक्कादाय माहिती समोर आली होती. मंदीर संस्थांनानं उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्य समितीने दिलेल्या अहवालात धक्कादायक बाब उघड झाली होती. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी संबंधीतांवर येत्या चार ते पाच दिवसांत गुन्हे दाखल होणार आहे. याची प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली आहे. दागिने गहाळ प्रकरणी संबंधित महंत, पुजारी, धार्मिक व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाणार आहे. यासाठी विधी विभागाचा कायदेशीर सल्ला मागितला गेला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

महाराष्ट्राची कुलदेवी तुळजाभवानी देवीच्या मंदिरातून  देवीच्या 27 अलंकारा पैकी 4 अलंकार गायब झाले तर 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्र देखील गायब करण्यात आले. सोन्याचा मुकुट, मंगळसुत्र, नेत्रजोड, माणिक मोती यांचा गहाळ झालेल्या दागिन्यांमध्ये समावेश आहे. चोरीला गेलेल्या मुकूटाचे वजन 826 ग्राम म्हणजे पाऊण किलो पेक्षा जास्त आहे. ज्याची किंमत आजच्या तारखेत 41 लाखांपेक्षा जास्त आहे. हा प्रकार इथेच थांबला नाही तर पुरातन खडावा (पादूका) काढून त्याजागी नवीन बसवण्यात आल्या.

दागिने गहाळ प्रकरणी संबंधित महंत, पुजारी, धार्मिक व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय 1 किलो 268 ग्राम वजनाची 289 पुतळ्या असलेली 3 पदरी शिवकालीन माळ दुरुस्तीची शिफारस करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

तपासात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात कोण कोणती नावे समोर येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हा सर्व गैरप्रकार कोणाच्या आशिर्वादाने तर होत नव्हता ना? असा प्रश्नही या निमित्त्याने निर्माण होत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.