Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | हे लोक कधीही तुमचं दु:ख समजू शकत नाही, आचार्य चाणक्य काय सांगतात…

आचार्य चाणक्य यांच्या नीति नेहमी व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत असतात (Chanakya Niti). त्यांनी याबाबतच्या सर्व गोष्टी आपल्या नीति शास्त्रात श्लोकच्या माद्यमातून सांगितल्या आहेत.

Chanakya Niti | हे लोक कधीही तुमचं दु:ख समजू शकत नाही, आचार्य चाणक्य काय सांगतात...
Acharya-Chanakya
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 12:48 PM

मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या नीति नेहमी व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत असतात (Chanakya Niti). त्यांनी याबाबतच्या सर्व गोष्टी आपल्या नीति शास्त्रात श्लोकच्या माद्यमातून सांगितल्या आहेत. माहितीनुसार आचार्य चाणक्य चंद्रगुप्त मौर्य यांचे महामंत्री होते. ते कौटिल्य या नावानेही ओळखले जायचे. त्यांच्याजवळ ज्ञानाचा सागर होता (Acharya Chanakya Said These People Never Understood Your Sorrow In Chanakya Niti).

त्यांच्या अनेक गोष्टी आजही आपल्या आयुष्यात फायद्यात ठरतात. जर मनुष्य त्यांच्या काही गोष्टींचं अनुसरण आपल्या जीवनात करत असेल तर निश्चितच त्यांना यश मिळेल, पण आपण नेहमीच त्यांच्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यांनी त्यांच्या धोरणांमध्ये व्यक्तीबाबत सांगितलं आहे की काही मनुष्य तुमचे दु:ख कधीही समजू शकत नाही.

हे लोक कधीही तुमचं दु:ख समजू शकत नाही

आचार्य चाणक्य सांगतात, काही लोक असे असतात जे दुसऱ्यांचं दु:ख कधीही समजू शकत नाहीत. हे म्हणजे लोक राजा, यमराज, अग्नी, चोर, लहान मुलं, भिखारी आणि कर्ज वसूल करणारा.

हे मनुष्य असतात प्राण्यांसारखे

आचार्य चाणक्य सांगतात की, माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये खाणे, झोपणे, घाबरणे आणि हालचाल करणे एक सारखेच असते. माणूस इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, केवळ त्याच्या विवेक, ज्ञानामुळे. म्हणून, ज्या माणसांना ज्ञान नाही, ते प्राण्यांसारखेच आहेत.

त्या व्यक्तीसाठी पृथ्वी स्वर्ग आहे

आचार्य चाणक्य यांच्यामते, ज्या व्यक्तीची पत्नी प्रेमळ आणि सदाचारी आहे, अशा व्यक्तीला इंद्रच्या राज्यात जाऊन सुख उपभोगण्याची गरज नाही. तसेच, ज्यांच्याकडे मालमत्ता आहे, ज्यांचा मुलगा सद्गुणी आहे आणि त्याच्यात चांगले गुण आहेत आणि ज्यांचे नातवंड आहेत.

तेच संकटांवर विजय मिळवू शकतात

आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्यांच्यामध्ये सर्व प्राण्यांबद्दल परोपकाराची भावना असते, ते सर्व प्रकारच्या संकटांना पराभूत करु शकतो आणि त्याला प्रत्येक चरणात सर्व प्रकारची समृद्धी मिळते.

सन्मान दिल्याने समाधान मिळते

चाणक्य धोरणांनुसार, हाताला शोभा दागिन्यांनी नाही तर दान केल्याने येते. चंदनाने नाही तर पाण्याने आंघोळ केल्याने निर्मलता येते. एखादी व्यक्ती खाऊ घातल्याने नाही तर सन्मान दिल्याने संतुष्ट होतो आणि मोक्ष स्वत:ला सजवून नाही तर आध्यात्मिक ज्ञान जागृत करून प्राप्त होते.

Acharya Chanakya Said These People Never Understood Your Sorrow In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | एकपेक्षा अधिक शत्रू असल्यासं कसं लढावं?आचार्य चाणक्य काय सांगतात…

Chanakya Niti | श्रीमंत होण्यासाठी अंगी हे गुण असावे, आचार्य चाणाक्य काय म्हणतात जाणून घ्या…

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.