AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दख्खनचा राजा जोतिबाच्या मानाच्या अश्वाचे निधन, दहा वर्षांच्या सेवेनंतर अखेरचा श्वास

दख्खनचा राजा श्री जोतिबा (Jyotiba) देवांच्या सेवेत असणाऱ्या सोनू उर्फ उन्मेष नावाच्या अश्वाचे आज ह्दयविकाराने निधन झाले. हा अश्व गेल्या दोन दिवसांपासून आजारी होता.

दख्खनचा राजा जोतिबाच्या मानाच्या अश्वाचे निधन, दहा वर्षांच्या सेवेनंतर अखेरचा श्वास
jyotiba
| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 2:14 PM
Share

मुंबई: दख्खनचा राजा श्री जोतिबा (Jyotiba) देवांच्या सेवेत असणाऱ्या सोनू उर्फ उन्मेष नावाच्या अश्वाचे आज ह्दयविकाराने निधन झाले. हा अश्व गेल्या दोन दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर वारणानगर येथील पशुवैद्यकीय डॉक्टर व गोकूळ दूध संघाच्या पशुवैद्यकीय तज्ञांकडून उपचार सुरू होते. त्यास ह्दयविकाराचा झटका आला. त्यात त्याचे निधन झाले. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मंदिराच्या (Temple) दक्षिण दरवाजा परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथील हिंमत बहादुर चव्हाण कुटुंबाने मार्च २०१२ मध्ये हा दख्खन उर्फ उन्मेष नावाचा मानाचा अश्व देवाच्या चरणी अर्पण केला होता. या कुटुंबाने यापूर्वी १९६२ मध्ये ही एक अश्व अर्पण केला होता. तो १९७५ पर्यंत होता. कालांतराने अनेक भाविकांनी जोतिबा डोंगरावर श्री चरणी अर्पण केले होते. २०११ मध्ये सोनू नावाच्या मानाच्या अश्वाचा ही आकस्मित मृत्यू झाला होता. हा पांढऱ्या शुभ्र रंगाचा घोडा मागच्या दहा गेल्या दहा वर्षापासून डोंगरावर तो श्री सेवेत होता.

कुठे राहायचा अश्व दख्खनचा राजा जोतिबा या देवाच्या सेवेला असणाऱ्या अश्वाचं अकस्मात निधन झालं आहे. या अश्वाच्या निधन झाल्याने हळहळ व्यक्त होते आहे. मंदिर परिसरातच या घोड्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.त्याच्या देखरेखीसाठी सेवक देखील नेमण्यात होता. प्रत्येक पालखी सोहळ्याला या घोड्याची हजेरी क्रमप्राप्त असायची. काही भाविक जोतिबाचे दर्शन घेतल्यानंतर घोड्याचा देखील दर्शन घ्यायला तबेल्यात जात असतं. या घोड्याला जोतिबाच्या भाविकांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

कसे आहे मंदिर जोतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू आणि त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन नाग आहे. जोतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव आणि तेवणाऱ्या ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. मूर्ती बटू भैरवनाथाच्या अवतारातील असून चतुर्भुज आहे. मूर्तीच्या हाती खड्‌ग, त्रिशूल, डमरू असून त्यांचे वाहन घोडा आहे.

संबंधीत बातम्या :

3 march 2022 Panchang | 3 मार्च 2022, गुरुवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

सुख आणि नशिबाची साथ हवी असेल तर या गोष्टी करायला विसरू नका

Phalguna Amavasya 2022 | आज या दोन शुभ योगांमध्ये साजरी होत आहे फाल्गुन अमावस्या, जाणून घ्या महत्त्व!

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.