Akshaya Tritiya Festival 2022 : अक्षय्य तिथीला शुभ कार्य करायचंय? मुहूर्त जाणून घ्यायचाय? पाहा, तुमच्या शहरातला ‘शुभ मुहूर्त’
Akshaya Tritiya 2022 : द्रीकपंचांग नुसार, 'शुभ मुहूर्त' किंवा शुभ वेळ सकाळी 05:39 ते दुपारी 12:18पर्यंत आहे. त्यामुळे 'शुभ मुहूर्त'चा एकूण कालावधी 6 तास 39 मिनिटांचा असेल. सोने खरेदीसाठी हा काळ शुभ मानला जातो.
नवी दिल्ली : अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya), ज्याला अक्षय तृतीया असेही संबोधले जाते, हा दिवस हिंदूंसाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो. अशी श्रद्धा आहे, की हा दिवस नशीब आणि समृद्धी आणतो. संस्कृतमध्ये (Sanskrit) अक्षय म्हणजे शाश्वत किंवा आनंद, यश आणि समृद्धीच्या संदर्भात कधीही कमी न होणारी गोष्ट. तृतीया म्हणजे तिसरा आणि या प्रकरणात, तो चंद्राचा तिसरा टप्पा आहे. हिंदू (Hindu) कॅलेंडरनुसार, हा सण ‘तृतीया तिथी’ किंवा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. अक्षय्य तृतीयेला आपण जे काही खरेदी करतो ते आपल्यासोबत कायमचे राहते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. बरेच लोक या दिवशी मालमत्तेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात आणि काहीजण या दिवशी वाहने खरेदी करतात.
पौराणिक कथेनुसार…
या शुभ दिवसाशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. हिंदू पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांची जयंती आहे. असेही मानले जाते, की या दिवशी सुदामाने आपला मित्र भगवान श्रीकृष्णाची भेट घेतली होती. पोह्यांच्या विनम्र प्रसादाच्या बदल्यात सुदामाला अमर्याद समृद्धीचे आशीर्वाद मिळाले होते.
शुभ मुहूर्त कधी?
द्रीकपंचांग नुसार, ‘शुभ मुहूर्त’ किंवा शुभ वेळ सकाळी 05:39 ते दुपारी 12:18पर्यंत आहे. त्यामुळे ‘शुभ मुहूर्त’चा एकूण कालावधी 6 तास 39 मिनिटांचा असेल. सोने खरेदीसाठी हा काळ शुभ मानला जातो. वेगवेगळ्या शहरांमध्ये ही वेळ थोडी बदलू शकते. तुमच्या सोयीसाठी आम्ही येथे वेगवेगळ्या शहरांच्या शुभ वेळा तुमच्यासाठी देत आहोत.
वेळ आणि शहरे –
– 05:39 am to 12:18 pm – नवी दिल्ली
– 06:10 am to 12:35 pm – मुंबई
– 06:06 am to 12:32 pm – पुणे
– 05:18 am to 11:34 am – कोलकाता
– 05:48 am to 12:06 pm – चेन्नई
– 05:38 am to 12:18 pm – नोएडा
– 05:47 am to 12:24 pm – जयपूर
– 05:49 am to 12:13 pm – हैदराबाद
– 05:58 am to 12:17 pm – बंगळुरू
– 06:06 am to 12:37 pm – अहमदाबाद
– 05:38 am to 12:20 pm – चंदिगड