AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HOLI 2021 | होळीला 499 वर्षांनंतर दुर्मिळ योग, जाणून घ्या काय आहे खास…

होळीचा सण यावर्षी आणखी एका कारणामुळे खास ठरणार आहे (Amazing Coincident On Holi 2021 After 499 Years).

HOLI 2021 | होळीला 499 वर्षांनंतर दुर्मिळ योग, जाणून घ्या काय आहे खास...
holi
| Updated on: Mar 17, 2021 | 11:52 AM
Share

मुंबई : होळीचा सण हा फाल्गुन महिन्याच्या पोर्णिमेला दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो (Amazing Coincident On Holi 2021 After 499 Years). पोर्णिमेच्या रात्री होलिका दहन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असतं. यावर्षी 28 मार्चला होलिका दहन केलं जाईल तर 29 मार्चला सकाळी धुलिवंदन असेल. पण, होळीचा सण यावर्षी आणखी एका कारणामुळे खास ठरणार आहे (Amazing Coincident On Holi 2021 After 499 Years).

ज्योतिषशास्त्र जाणकारांच्या मते, यावेळी होळीवर 499 वर्षांनंतर ग्रहांचा दुर्मिळ योग येतो आहे. चला जाणून घेऊ या खास योगाबाबत –

यंदाच्या होळीला तब्बल 499 वर्षानंतर दुर्मिळ योग

यावेळची होळी खूप खास असणार आहे. तब्बल 499 वर्षांनंतर होळीच्या निमित्ताने अत्यंत दुर्मिळ योग तयार होणार आहे. 29 मार्चच्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कन्या राशीत विराजमान होईल, तर शनि ग्रह स्वतःच्या राशीमध्ये राहील. असा ग्रह योगायोग 3 मार्च 1521 रोजी झाला होता. त्यामुळे होळीला 499 वर्षानंतर दुर्मिळ महायोग तयार होतो आहे. त्याशिवाय, यावेळी सर्वार्थसिद्धि योगात होळी साजरी करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे अमृतासिद्धी योगही या दिवशी येणार आहे .

होळीचा शुभ मुहूर्त

? होलिका दहनचा दिवस : 28 मार्च 2021

? रंगपंचमी दिवस : 29 मार्च 2021

? होलिका दहनचा शुभ मुहूर्त : संध्याकाळी 6:37 वाजल्यापासून ते रात्री 8:56 वाजेपर्यंत

? पौर्णिमेची तिथी प्रारंभ : 28 मार्च सकाळी 3:27 वाजता

? पौर्णिमेची तिथी समाप्ती : 29 मार्च 12:17 वाजता.

Amazing Coincident On Holi 2021 After 499 Years

बंधुत्वाचा सण होळी

होळीचा सण म्हणजे बंधुत्वाचा सण आहे. लोक आपापसातल्या तक्रारी विसरून हा उत्सव एकमेकांसोबत साजरा करतात आणि एकमेकांना मिठी मारून अभिवादन करतात. यावेळी, रंगांची होळी अर्थात रंगपंचमी खेळली जाते. यंदाही लोक या उत्सवाबद्दल खूप उत्साही आहेत. या उत्सवाची तयारी बरेच दिवस अगोदरच सुरू होते. काही ठिकाणी याची सुरुवात बसंत पंचमीच्या दिवसापासून होते. या दिवशी ढोल-ताशांच्या पूजेनंतर ज्या ठिकाणी होलिका दहन होईल तेथे लाकूड ठेवले जाते.

Amazing Coincident On Holi 2021 After 499 Years

संबंधित बातम्या :

Omkareshwar Temple : भगवान शंकराच्या दर्शनासाठी प्रकट झाली नर्मदा नदी, श्रद्धेची अनोखी कहाणी

Mahashivaratri 2021 | महाकालेश्वराची जगप्रसिद्ध ‘भस्म आरती’, वाचा कशी सुरु झाली ‘ही’ आरती…

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.