AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anant Chaturdashi 2021 | अनंत चतुर्दशीला 14 गाठींचा धागा का परिधान केला जातो, जाणून घ्या याची विधी आणि महत्त्व

सनातन परंपरेत भगवान विष्णूची कृपा मिळवून देणाऱ्या अनंत चतुर्दशीला अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण या पवित्र तिथीला भगवान विष्णूच्या अनंत स्वरुपाची विशेष पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीचा पवित्र सण दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो. यावर्षी अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी येत आहे. भक्त हा पवित्र सण अनंत चौदस म्हणून ओळखतात.

Anant Chaturdashi 2021 | अनंत चतुर्दशीला 14 गाठींचा धागा का परिधान केला जातो, जाणून घ्या याची विधी आणि महत्त्व
Lord Vishnu
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 1:15 PM

मुंबई : सनातन परंपरेत भगवान विष्णूची कृपा मिळवून देणाऱ्या अनंत चतुर्दशीला अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण या पवित्र तिथीला भगवान विष्णूच्या अनंत स्वरुपाची विशेष पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीचा पवित्र सण दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो. यावर्षी अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी येत आहे. भक्त हा पवित्र सण अनंत चौदस म्हणून ओळखतात. ज्यात भगवान विष्णूची पूजा केल्यावर प्रसाद म्हणून 14 गाठीचे अनंता हातात धारण केले जाते. अनंत चौदासच्या दिवशी अनंता परिधान करण्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.

14 गाठीच्या अनंत सूत्राचे महत्त्व काय

अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या उपासनेत 14 गाठी असलेल्या अनंत सूत्राची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की 14 गाठी असलेला हा पवित्र धागा भगवान विष्णूने बनवलेल्या 14 लोकांचे प्रतीक आहे. जो बाहूमध्ये प्रसादाच्या रुपात बांधल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची भीती किंवा अडथळा येत नाही. भगवान विष्णू आपल्या भक्ताचे प्रत्येक प्रकारे रक्षण करतात.

अनंत सूत्राची पूजा कशी करावी?

? अनंत चतुर्दशीच्या दिवशी आंघोळ आणि ध्यान केल्यानंतर भगवान विष्णूची विधीवत पूजा करा आणि अनंत चतुर्दशीची कथा वाचा

? यानंतर, कुंकू, हळद आणि केशराने कापसाचा धागा रंगवल्यानंतर त्यात 14 पवित्र गाठी तयार करा

? अनंताला तयार करुन भगवान विष्णूचा मंत्र “अच्युतय नमः अनंतय नमः गोविंदाय नमः” या मंत्राचे पठण करुन भगवान विष्णूला ते समर्पित करा

? त्यानंतर प्रसादाच्या रुपात ते अनंत आपल्या उजव्या हातात धारण करा.

? हे अनंत सूत्र सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून आणि शत्रूंपासून रक्षण करणारे आहे.

अनंत सूत्र धारण करण्याचे नियम काय?

अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूचा प्रसाद मानला जाणारा अनंत सूत्र धारण केल्यानंतर रात्रीच्या वेळी ते काढून ढेवले जाते आणि दुसऱ्या दिवशी ते पवित्र नदी किंवा तलावात विसर्जित केले जाते. जर त्या दिवशी ही क्रिया शक्य नसेल तर त्या व्यक्तीला पुढील 14 दिवसांसाठी ते अनंता परिधान करावा लागेल. जर 14 दिवसानंतरही त्याला ही क्रिया संपन्न करता येत नसेल तर त्याला ते वर्षभर घालावे लागेल आणि पुढच्या अनंत चतुर्दशीपर्यंत ते बांधून ठेवावे लागेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

जाणवं का घातलं जातं? जाणून घ्या ते घालण्याचा नियम आणि मंत्र

Lord Ganesha Worship Tips : गणपतीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केल्यास कोणती इच्छा पूर्ण होते

राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू.
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन.
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल.