Manik Ruby gems|’माणिक रत्न ‘ परिधान करताय मग हे नियम नक्की जाणून घ्या, नाहीतर …
सूर्य अशुभ असताना व्यक्ती अहंकारी होतो. अशा व्यक्तीच्या नकावर नेहमी राग असतो. यावर उपाय म्हणून माणिक रत्न वापरले जाते. त्याला सूर्यकांत मणी असेही म्हणतात.
मुंबई : जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्य बलवान आणि शुभ फल देणारा असेल तर त्याला घरात आणि बाहेर सर्वत्र मान-सन्मान मिळतो. त्याची सर्व कामे सहज होतात. ती व्यक्ती पराक्रमी मानली जाते.पण जर सूर्य अशक्त असेल तर हे सर्व सुख कमी होते. सूर्य अशुभ असताना व्यक्ती अहंकारी होतो. अशा व्यक्तीच्या नकावर नेहमी राग असतो. यावर उपाय म्हणून माणिक रत्न वापरले जाते. त्याला सूर्यकांत मणी असेही म्हणतात. रुबी स्टोन धारण केल्याने कीर्ती आणि संपत्ती वाढते. माणिक दगड मेष राशीत जन्मलेल्या लोकांसाठी मुलांचा आणि शिक्षणाचा कारक सिद्ध होतो, तर सिंह राशीत जन्मलेल्या लोकांची जीवनशक्ती आणि आयुष्य वाढते, तर धनु राशीत जन्मलेल्या लोकांसाठी नशिबाचे दरवाजे उघडतात. अशी मान्याता आहे.
रुबी स्टोन घालण्यापूर्वी या गोष्टी विचाऱ्यात घ्या
रुबी स्टोन घालण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घेऊन योग्य वजनाचा आणि शुद्ध माणिक दगडच घालावा.
रुबीची शुद्धता ओळखण्यासाठी, दुधात दूध टाकल्यावर त्याचा रंग गुलाबी दिसतो. तसेच पांढऱ्या चांदीच्या भांड्यात माणिक सूर्यासमोर ठेवल्यास चांदीचे भांडे लाल रंगाचे दिसू लागते.
माणिक रत्न धारण करण्याआधी सूर्यदेवाच्या मंत्रांनी त्याची उर्जा आणि पूजा करावी. ते धारण केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून आदित्य हृदय स्तोत्राचा दररोज तीन वेळा पाठ करा. या उपायाने तुम्हाला या रत्नाची शुभ आणि सूर्यदेवाची कृपा नक्कीच प्राप्त होईल.
माणिक रत्नाचे लाभ:
सूर्य ग्रहाचा रत्न माणिक खूपच चमकदार घट्ट लाल व गुलाबी रंगाचा असतो. डोळ्यांबाबत त्रास होत असतील तर हा रत्न धारण करावा. या रत्नाच्या प्रभावा मुळे प्रेमाच्या भावना जागृत होतात व व्यक्तित नेतृत्व करण्याचे गुण उत्पन्न होतात. सरकारी क्षेत्रात काम करत असणाऱ्या लोकांसाठी हा रत्न खूप लाभकारी असतो. कामकाजात लाभ आणि आपल्या प्रगति साठी हा रत्न धारण केला जातो. आजारामुळे त्रास होत असतील व त्या पासून सुटका पाहिजे असेल तर हा रत्न अवश्य धारण करावा.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
Chanakya Niti : ही 5 लक्षणं म्हणजे, आर्थिक संकटाची घंटा! आताच तपासून पाहा
तुमच्या घरात ही पेंटिंग आहेत तर आताच काढा नाहीतर…
Drawing Room Vastu | ड्रॉईंग रूममधील वस्तू योग्य दिशेला ठेवा , नाहीतर आर्थिकनुकसान नक्की